घोटी : गेल्या आठवड्यात घोटी शहरातील अजिंठा वाइन शॉप जवळ एक युवक लोखंडी फायटरने झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. नाशिकच्या शासकीय रु ग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असतांना त्याचा गुरूवारी (दि.२६) मृत्यू झाला. याप्रकरणी घोटी पोलिसांनी ३ अज्ञात युवकांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपअधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान येथील चायनीज गाडे उशिरापर्यंत सुरू राहिल्याने मद्यपी युवकांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे संबंधितांवर कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.याबाबतची अधिक माहिती अशी की, १५ डिसेंबरला रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घोटी येथील अशोक संतु भांगरे (रा. शेणवड बुद्रुक) हा युवक रस्त्याने जात होता. अजिंठा वाइन शॉपजवळील चायनीज पदार्थांच्या दुकानाजवळ तो लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला थांबला. यावेळी कोणीतरी अनोळखी इसमाने त्याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्याने पैसे दिले नाही म्हणून त्या अनोळखी इसमाला राग आला. त्याने अशोक भांगरे याला लोखंडी फायटरने मारहाण करून गंभीर जखमी केले. यावेळी त्याच्या पोटाच्या उजव्या बाजुला गंभीर जखम करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी झालेल्या अशोकला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले मात्र, उपचार सुरू असतांना गुरुवारी त्याचा मृत्यू झाला. घोटी पोलिसांनी सुनील संतु भांगरे यांच्या फिर्यादीवरून ३ अज्ञात युवकांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, आनंदा माळी अधिक तपास करीत आहेत.
तीन अज्ञात युवकांवर खुनाचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 5:51 PM
घोटी : मारहाणीत जखमी युवकाचा मृत्यू
ठळक मुद्देअशोक भांगरे याला लोखंडी फायटरने मारहाण करून गंभीर जखमी केले. यावेळी त्याच्या पोटाच्या उजव्या बाजुला गंभीर जखम करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.