मनमाड : शहरात कोरोनाचा उद्रेक झाला असून, बुधवारी (दि. ३) आलेल्या अहवालात १५ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील १३ जणांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.बुधवारी प्राप्त झालेल्या कोरोनाच्या अहवालात मनमाड शहरातील १५ रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये यापूर्वी शाकुंतलनगरमध्ये आढळून आलेल्या रुग्णांच्या कुटुंबातील १३ जणांचा समावेश आहे. या कुटुंबातील चार ते सात वयोगटातील तीन बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. या व्यतिरिक्त आययूडीपी भागातील एक व मनमाड महाविद्यालयाजवळील एक जणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, प्रशासनाच्या वतीने शहरातील बाधित व प्रतिबंधित क्षेत्रात कडकडीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहराच्या बाधित क्षेत्रातील सर्व कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.
एकाच कुटुंबात १३ जणांना बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 9:39 PM