शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

भोजापूरच्या आवर्तनात पूर्व भागावर अन्याय होत असल्याची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 5:44 PM

सिन्नर : पूर्व भागात दुष्काळाची भयानक स्थिती असतांना भोजापूर धरणातून फुलेनगर व दुशिंगपूर बंधाऱ्यामध्ये पाणी सोडले जात नाही. भोजापूर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत या परिसराचा विचार न करताच अधिकारी-लोकप्रतिनिधी यांनी पिण्यासह शेतीच्या पाण्याचे आवर्तन सोडण्याचा निर्णयाला पूर्वभागातील ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप नोंदवला.

सिन्नर : पूर्व भागात दुष्काळाची भयानक स्थिती असतांना भोजापूर धरणातून फुलेनगर व दुशिंगपूर बंधाऱ्यामध्ये पाणी सोडले जात नाही. भोजापूर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत या परिसराचा विचार न करताच अधिकारी-लोकप्रतिनिधी यांनी पिण्यासह शेतीच्या पाण्याचे आवर्तन सोडण्याचा निर्णयाला पूर्वभागातील ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप नोंदवला. या बंधाºयांमध्ये पाणी न सोडल्यास भोजापूर कालव्यात उपोषणाला बसण्याचा इशारा तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत वावी परिसरातील शेतकºयांनी दिला.भोजापूरच्या पाण्यासह दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांचा चारा, निळवंडे कालवा प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पूर्व भागातील शेतकºयांनी सिन्नर-शिर्डी मार्गावर वावी येथे आठवडाभरापूर्वी रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी तहसीलदार नितीन गवळी यांनी सर्व प्रश्नांसंदर्भात बैठक घेवून तोडगा काढण्याची ग्वाही दिली होती. या पार्श्वभूमीवर सोमवार (दि.२६) तहसीलदारांच्या दालनात पूर्व भागातील विशेषत: वावी परिसरातील शेतकºयांची व डावा कालवा चारी नं.४ च्या लाभक्षेत्रातील विविध गावांतील शेतकºयांची बठक पार पडली.दुष्काळी परिस्थितीत जनावरांच्या पिण्यासाठी फुलेनगर, दुशिंगपूरचे बंधाºयात पाणी सोडण्याचा विचार न करताच आवर्तन सोडण्याचा निर्यणच कसा घेण्यात आला, असा संतप्त सवाल शेतकºयांनी उपस्थित केला. या बंधाºयासाठी पाण्याचे आरक्षण नसल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी स्पष्ट केले. त्यामुळे दीड-दोन तास त्यावर चर्चा सुरू होती. शेवटी तहसीलदार गवळी यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यामार्फत पाण्याच्या आरक्षणाबाबातचा स्वतंत्र प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्याचा शब्द दिला. त्यानंतर बैठक आटोपली.

टॅग्स :Waterपाणी