शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

आदिवासी तालुक्यांवर अन्याय : स्थायी समितीत जोरदार चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 2:00 AM

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा तालुक्यांतील रस्ते बांधकामासाठी सन २०१७-१८ मध्ये प्राप्त झालेला कोट्यवधी रुपयांचा निधी अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे शासनाकडे परत गेल्याची बाब स्थायी समितीच्या सभेत उघडकीस आली आहे. सदरचा निधी का परत गेला, त्याला जबाबदार कोण याचा खुलासा प्रशासनातील अधिकारी करू शकले नाहीत. त्यामुळे सदस्यांनी अधिकाºयांना धारेवर धरले.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे ४० कोटींचा निधी परत

नाशिक : जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा तालुक्यांतील रस्ते बांधकामासाठी सन २०१७-१८ मध्ये प्राप्त झालेला कोट्यवधी रुपयांचा निधी अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे शासनाकडे परत गेल्याची बाब स्थायी समितीच्या सभेत उघडकीस आली आहे. सदरचा निधी का परत गेला, त्याला जबाबदार कोण याचा खुलासा प्रशासनातील अधिकारी करू शकले नाहीत. त्यामुळे सदस्यांनी अधिकाºयांना धारेवर धरले.स्थायी समितीच्या सभेत भास्कर गावित यांनी सदरचा प्रश्न उपस्थित केला. सन २०१७-१८ या वर्षासाठी आदिवासी उपाययोजनांमधून नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर तालुक्यांतील रस्त्यांचे बळकटीकरण, नवीन रस्त्यांची बांधणी व दुरुस्तीसाठी ४० कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला होता. त्यासाठी कोणत्या रस्त्यांची कामे केली जाणार याचे अंदाजपत्रक तयार करून कामांना प्रशासकीय मान्यताही देण्यात आली होती. तथापि, बांधकाम खात्याच्या अधिकाºयांनी कार्यारंभ आदेश काढले नाहीत, परिणामी मार्च-२०१९ मध्ये हा निधी पुन्हा शासनाकडे परत करावा लागला. भास्कर गावित यांनी सभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर निधी परत गेल्याचा खुलासा बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गांगुर्डे यांनी केला. त्यावर सदस्यांनी संताप व्यक्त केला. एकीकडे ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी शासनाकडून निधी मिळत नसल्याची ओरड केली जाते, दुसरीकडे मात्र निधी मिळूनही अधिकाºयांच्या काम न करण्याच्या वृत्तीमुळे पैसे परत जात असल्याची टीका करण्यात आली. या साºया बाबीस जबाबदार कोण व त्यांच्यावर काय कारवाई करणार? असा प्रश्न गावित, डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी विचारला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शीतल सांगळे यांनीही कार्यकारी अभियंता गांगुर्डे यांना कामांची प्रशासकीय मान्यता का देण्यात आली नाही, अशी विचारणा करून धारेवर धरले. त्यावर गांगुर्डे यांनी निवडणूक आचारसंहितेचे थातूरमातूर कारण देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. सदरच्या निधीची पुन्हा शासनाकडे मागणी करण्यात येणार असल्याचे गांगुर्डे यांनी सांगितले़चांदवडला बहुद्देशीय इमारतसमाजकल्याण खात्याच्या निधीतून चांदवड येथे दिव्यांग व्यक्तींसाठी बहुद्देशीय इमारत उभारण्यास मंगळवारच्या सभेत मंजुरी देण्यात आली. या इमारतीत दिव्यांग व्यक्तींसाठी सभागृह, ट्रेनिंग सेंटर, बचत गटांना गाळे आदींची सोय असणार आहे. अपंग कल्याण निधीतून प्रारंभी ८९ लाख रुपये या इमारतीसाठी मंजूर करण्यात आले होते. प्रशासकीय कारणास्तव प्रशासकीय मान्यता न मिळाल्यामुळे समाजकल्याण खात्याचा काही निधी अन्यत्र वर्ग करण्यात आला. प्रारंभी ४२ लाखांच्या निधी खर्चाला मंजुरी देण्यात आली व पुढच्या आर्थिक वर्षात उर्वरित रकमेची तरतूद करण्याचे ठरविण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद