कंधाणे : आजोळी आल्यावर ज्या भाच्याला प्रेमाने अंगाखांद्यावर खेळवले, लहानाचे मोठे होताना पाहिले त्याच्या मृत्यूच्या धक्क्याने मामानेही प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना बागलाण तालुक्यातील कंधाणे येथे बुधवारी (दि. ७) रात्री घडली. कंधाणे येथील प्रगतिशील शेतकरी यशवंत उत्तम देवरे (५२) यांना दहा-बारा दिवसांपासून लिव्हरच्या आजाराने ग्रासले होते. उपचारासाठी त्यांना सटाणा येथील खासगी दवाखान्यात दाखल केले होते; पण वैद्यकीय उपचाराला साथ देत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना घरी नेण्याचा सल्ला दिला. घरी कंधाणे येथे आणल्यानंतर दोन दिवसांनी बुधवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले. याचवेळी डांगसौंदाणे येथील मामा नामदेव दोधा वाघ त्यांना पाहण्यासाठी आले. यशवंत देवरे यांच्या निधनाने मामा नामदेव वाघ यांना गहिवरून आले आणि या धक्क्यातच ते जमिनीवर कोसळले. त्यातच त्यांचेही निधन झाले. गुरुवारी दोघांवर शोकाकुल वातावरणात आपापल्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.काळीज पिळवटून टाकणाºया मामा-भाच्याच्या दुर्दैवी घटनेने कंधाणे व डांगसौंदाणे दोघा गावांवर शोककळा पसरली आहे.
मामा-भाच्याच्या निधनाने बागलाण तालुक्यात हळहळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 12:06 AM
कंधाणे : आजोळी आल्यावर ज्या भाच्याला प्रेमाने अंगाखांद्यावर खेळवले, त्याच्या मृत्यूच्या धक्क्याने मामानेही प्राण सोडल्याची घटना कंधाणे येथे बुधवारी (दि. ७) रात्री घडली.
ठळक मुद्दे उपचाराला साथ देत नसल्याने घरी नेण्याचा सल्लाधक्क्यातच ते जमिनीवर कोसळले