कळवण : येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालयात इनरव्हील क्लब आँफ कळवण व देवळा यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. इनरव्हील डिस्ट्रीक्ट ट्रेझरर गिरीषा ठाकरे अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख अतिथी म्हणुन राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस अधिक्षक डॉ. अजय देवरे, नगराध्यक्ष मयूर बहिरम, उपनगराध्यक्ष कौतीक पगार, विलास शिरोरे, कमकोचे संचालक योगेश मालपुरे, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रा. रविंद्र पगार, लेखा अधिकारी विनता देवरे उपस्थित होते.बोलण्याची शक्ती परमेश्वराने मानवाला दिलेली असतांना सध्याची पिढी आभासी जगात व्यस्त असल्याने हरवत चाललेला संवाद ही गंभीर बाब असुन मानवाच्या प्रगतीसाठी व सर्वांगिण उन्नतीसाठी परस्परांशी सुसंवाद निर्माण होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. अश्लेषा कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केले. गुन्हे शाखेचे पोलिस अधिक्षक डॉ. अजय देवरे यांनी स्त्रीयांवरील अत्याचार, स्वसंरक्षण याविषयी मार्गदर्शन केले.मावळत्या अध्यक्ष महानंदा अमतकार यांनी अध्यक्ष पदाचा पदभार नूतन अध्यक्षा अिश्वनी पाटील यांचेकडे तर सचिव वैशाली कोठावदे यांनी पदभार नूतन सचिव सुचिता रौंदळ यांच्याकडे सोपविला. नवीन कार्यकारिणीत व्हा. प्रेसिडेंट पदी वैशाली कोठावदे, ट्रेझरपदी नयना पगार, आय.एस.ओ. पदी मनीषा शिंदे, सी.सी पदी मनीषा वाघ यांची निवड झाली. तर इनरव्हील क्लब आॅफ देवळाच्या अध्यक्षपदी भाग्यश्री अतुल पवार व सचिवपदी समृद्धी सुशिल क्षत्रीय यांनी पदभार स्वीकारला. कार्यक्र मास उपस्थित महिलांमधून पाच भाग्यवान महिलांना बिक्षसे देण्यात आली. मनिषा वाघ, मिनाक्षी मालपुरे, मंजुषा देवघरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. पाहुण्यांचे स्वागत ममता पगारने स्वागतगीताने केले. प्रास्ताविक नगरसेविका अनिता जैन यांनी केले. सूत्रसंचलन नयना पगार व सुवर्णा पगार यांनी केले. सविता बधान यांनी इनरव्हील क्लब मध्ये पदार्पण केले. कार्यक्र मास इनरव्हील सदस्या निर्मला संचेती, निशा वालखेडे, लता वेढणे, जयश्री शिरोरे, रोहिणी कापडणे, शोभा पगार, रेखा सावकार, स्नेहा मालपुरे, शितल मुसळे, उर्मिला पगार, प्रमिला जैन, स्मिता खैरणार, मनिषा जून्नरे, संगिता देवरे, मनिषा आहेर, कांचन पगार आदीस उपस्थित होते.
इनरव्हील क्लब आॅफ कळवण, देवळाचा पदाधिकारी पदग्रहण समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 7:35 PM
कळवण : येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालयात इनरव्हील क्लब आँफ कळवण व देवळा यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला.
ठळक मुद्देगुन्हे शाखेचे पोलिस अधिक्षक डॉ. अजय देवरे यांनी स्त्रीयांवरील अत्याचार, स्वसंरक्षण याविषयी मार्गदर्शन केले.