सटाणा : तालुक्यातील मोरेनगर येथील जिल्हा परिषद शाळेत सातत्याने विद्यार्थ्यांंनी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नवनवीन शालेय उपक्र ममुळे विद्यार्थ्यांचाही आत्मविश्वास वाढीस लागला असून. शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोरेनगर गावासह संपूर्ण सटाणा शहरातून कचऱ्याचे व्यवस्थापन नाविन्यपूर्ण पद्धतीने करून समाजापुढे आदर्श ठेवला केला आहे.सद्या सर्वत्र प्रमाणापेक्षा जास्त पाऊसामुळे गावागावात विविध जीवघेण्या आजारांचे साम्राज्य पसरलेले दिसत असून, डासांमुळे रु ग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचा बघायला मिळत आहेत. यामुळे बºयाच वेळा विद्यार्थीची सुद्धा आजारपणामुळे शाळा बुडत असल्याने मोरेनगरच्या विद्यार्थ्यांनी एक अनोखी शक्कल लढवत ‘एक पाउल स्वच्छतेकडे’ हे अभियान राबवण्यास सुरु वात करून समाजाला एक नवा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.दवाखान्यातील रु ग्णांना भेटण्यासाठी नातेवाईक, मित्र मंडळी नारळपाणी घेऊन येतात, मात्र हे रिकामी झालेली शहाळे डेंगूच्या डासांचे माहेरघर बनतात, नेमक्या या सहज महत्व नसलेल्या बाबीचा विचार या मुलांनी केला. आणि त्यावर व्यापक स्वरु पात अभियान राबवण्याचे नियोजन त्यांनीच गटचर्चा करून केले.गावातील तसेच सटाणा शहराच्या शेजारील चौगाव बर्डी जवळच्या कचºयाच्या ठिकाणी, शहरातील दवाखान्यात जावून कचºयात जमा झालेले रिकामे शहाळे शाळेत आणून त्यांत शेतातील माती भरून एक रोपटे लावून प्रत्येक मुलांनी आपल्या शाळेत, घराजवळ, शेतात हि झाडे लावली. एवढेच नाही तर त्यांनी दवाखान्यात जावून रु ग्णाच्या नातेवाईकांना ही झाडे लावण्यास प्रवृत्त केले.बसस्थानक परिसरातील फळ विक्रेत्यांना व ग्राहकांना ही झाडांची रोपे भेट देत कचºयाचे निर्मुलन होऊन डेंगू डासांची उत्पत्ती कमी होऊन नवीन सुंदर हिरवळीच्या रूपाने निर्मळ निसर्गाची निर्मिती करण्याचा प्रयत्न विद्याथ्यांनी केला आहे.हा उपक्र म राबवून यशस्वी केला असून संपूर्ण तालुक्यातील अन्य विद्यार्थ्यांनी हा उपक्र म राबवावा यासाठी मोरेनगरच्या विद्यार्थ्यांनी गटशिक्षणाधिकारी टी. के. घोंगडे, केंद्रप्रमुख एम. एस. भामरे यांना निवेदन देवून आवाहन केले आहे.विद्यार्थ्यांच्या या उपक्र माचे बागलाण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत कापडणीस, डॉ .पंकज शिवदे यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या या उपक्र मास मुख्याध्यापक नारायण सोनवणे, शिक्षक सोपान खैरनार, भिकु कापडणीस, प्रतिभा अहिरे, वैशाली पवार यांनी मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी निकोप समाज निर्मितीसाठी यशस्वीपणे राबवलेला हा उपक्र म नक्कीच अस्वच्छता दूर होऊन डेंग्यू, मलेरिया सारखे आजार नष्ट होऊन गाव आणि शहर स्वच्छ होण्यासाठी ‘डिजाईन फोर चेंज’ या उपक्र मातून मुलांमधील ‘आय कॅन’ च्या उर्मीमुळे आत्मविश्वास वाढत असल्याने जिल्ह्यातील सर्व शाळेतील मुलांसाठी हा उपक्र म दिशादर्शक आहे.- डॉ. वैशाली वीर, शिक्षणाधिकारी (प्राथ.)जिल्हा परिषद, नाशिक.मी काही करू शकतो, हि भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाल्याने व डेंग्यचेू निर्मुलन करून स्वस्थ समाज निर्मितीसाठी मुलांनी स्वत: केलेल्या पर्यावरण पूरक उपक्र मामूळे समाधान वाटते.- सोपान खैरनार, शिक्षक, मोरेनगर.
डेंग्यु आजारापासून मुक्तीसाठी नाविन्यपूर्ण कचरा व्यवस्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2019 9:37 PM
सटाणा : तालुक्यातील मोरेनगर येथील जिल्हा परिषद शाळेत सातत्याने विद्यार्थ्यांंनी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नवनवीन शालेय उपक्र ममुळे विद्यार्थ्यांचाही आत्मविश्वास वाढीस लागला असून. शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोरेनगर गावासह संपूर्ण सटाणा शहरातून कचऱ्याचे व्यवस्थापन नाविन्यपूर्ण पद्धतीने करून समाजापुढे आदर्श ठेवला केला आहे.
ठळक मुद्देसटाणा : मोरेनगर प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचा उपक्र म