नाशिक : जलसंपदा खात्यात पूर्वीच्या सरकारने केलेल्या गैरव्यवहाराबाबत चौकशी करणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला आवश्यक ती सर्व कागदपत्रे देण्यात आली असून, त्यासाठी अवर सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली आहे. आजपावेतो केली जात असलेली चौकशी योग्य रीतीने सुरू असून, लवकरच त्याबाबत खुलासा केला जाईल, अशी माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याची बैठक आटोपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना महाजन यांनी पंकजा मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपाबाबतही स्पष्टीकरण दिले. मार्च अखेर असल्यामुळे केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या दरानुसार महिला बालकल्याण खात्याने खरेदी केली असून, एप्रिलनंतर रेट आॅफ कॉन्ट्रॅक्ट बदलण्यात आलेले आहेत. खुद्द मुख्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा केलेला असल्याने जर गरज पडली, तर चौकशी करण्याचीही तयारी दर्शविली आहे. त्यामुळे यासंदर्भातील वाद गैर असल्याचे महाजन यांनी सांगितले. राज्याच्या गृहमंत्रिपदाबाबत गेल्या दोन महिन्यांपासून चर्चा होत असली तरी, आपण जलसंपदा खात्यातच रममाण झालो असून, या खात्याचे कामकाज मोठे असल्याने आपण त्यात समाधानी आहोत असे सांगून, पक्षाने दिलेली जबाबदारी आपण योग्य रीतीने पार पाडत आहोत, असे ते म्हणाले. जिल्'ातील सात तहसीलदारांच्या नियुक्तीबाबत निर्णय मुख्यमंत्री घेतील, त्याबाबत आपणास माहिती नाही; परंतु जिल्'ात कामे करण्यासाठी अधिकाऱ्यांची गरजही तितकीच महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
जलसंपदाची चौकशी योग्य रीतीने
By admin | Published: July 01, 2015 12:28 AM