नाशिक : विधानसभा निवडणुकीत होणारा पैशांचा वापर आणि व्यवहारावर निवडणूक शाखेचे लक्ष असतेच, आता बॅँकांना उमेदवारांच्या दैनंदिन व्यवहारांवर लक्ष केंद्रित करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांकडून एखाद्याच्या खात्यात एक लाख ते १० लाखांपर्यंतची रक्कम खात्यातून काढणे किंवा टाकण्याच्या व्यवहाराची माहिती बॅँकेकडून आयकर विभागाला दिली जाणार आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी या संदर्भातील आदेश बॅँकाना दिले आहेत.विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने उमेदवारांना २८ लाखांच्या खर्चाची मर्यादा दिली असून, या काळात खर्च होणाºया बाबींचे दरदेखील निश्चित करून दिलेले आहेत. आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जिल्हा निवडणूक शाखेचे उमेदवारांच्या खर्चावर लक्ष असून, कारवाईचे अधिकारदेखील आहेत. निवडणुकीमध्ये केला जाणारा खर्च हा आयोगाच्या आचारसंहितेच्या चौकटीत करण्याचे बंधनकारक असले तरी अनेकविध मार्गांनी त्यापेक्षा अधिक खर्च होतो. या खर्चावर निर्बंध आणण्यासाठी अशाप्रकारच्या व्यवहारावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. बॅँकेतून होणाºया संभाव्य उमेदवारांच्या खात्यातील दैनंदिन व्यवहाराची माहिती बॅँक ठेवणार आहेच, शिवाय आयकर विभाग आणि निवडणूक शाखेलादेखील माहिती दिली जाणार आहे.निवडणुकीच्या काळात एका बॅँक खात्यातून अनेक व्यक्तींच्या बॅँक खात्यात रक्कम जमा होण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. एक लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम खात्यातून काढणे आणि टाकण्यासाठी संबंधित उमेदवालास प्रतिज्ञापत्र बॅँकेकडे सादर करणे सक्तीचे करण्यात आले आहे.निवडणूक काळात अवैध रोकड नियंत्रणासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या सूचनेनुसार एटीएम मशीन्समध्ये रोकड जमा करताना वाहतुकीसाठी एसओपीचा वापर करण्याची सक्ती करण्यात आली आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावाउमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या संदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजना आणि अधिकाºयांची जबाबदारी याची माहिती जिल्हाधिकाºयांनी बैठकीत दिली. यावेळी त्यांनी निवडणूक खर्चासंदर्भातील जबाबदाºया, नियंत्रण आणि अहवाल याचादेखील आढावा घेतला. यावेळी त्यांनी निवडणूक काळात खर्चावरील नियंत्रणासाठी बॅँकांची जबाबदारी तसेच आयकर विभागाची भूमिका याविषयी अधिकाºयांना मार्गदर्शन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, निवडणूक उपजिल्हाधिकारी कुंदन सोनवणे, तहसीलदार प्रशांत पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.
एक लाखाची रक्कम काढल्यास होणार चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 12:47 AM