मालेगाव : जंतूनाशक औषधे खरेदीची निविदा काढण्यास प्रशासनाकडून विलंब होत आहे. येत्या आठ दिवसात जंतूनाशक खरेदीची निविदा काढावा. स्थायी समितीची मंजुरी न घेता जंतूनाशक औषधे पुरविणाऱ्या ठेकेदाराला मुदतवाढ संशयास्पदरित्या दिली गेली आहे. या प्रकरणाची चौकशी करुन ठेकेदाराचे बिल अदा करावे, अशा सूचना स्थायी समिती सदस्यांनी देत शहरातील अतिक्रमण व जंतूनाशकाच्या ठेक्यावरुन प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. महापालिका स्थायी समितीची सभापती जयप्रकाश बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली व नगरसचिव राजेश धसे यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या सभागृहात बैठक झाली.बैठकीच्या प्रारंभी जंतूनाशक खरेदी निविदेचा विषय चर्चेला आला. गेली चार वर्षे जंतूनाशके पुरविणारी एजन्सी पाचव्यांदा अपात्र कशी होते? १ कोटीचा ठेका असताना ४६ लाखाच्या अधिकच्या खर्चाला स्थायीची मंजुरी न घेता मुदतवाढ कशी दिली, असा सवाल स्थायी समिती सदस्यांनी विचारला. लक्षावधी रूपये खर्च करुन डुक्कर मारण्याचे औषध खरेदी करण्यात आले; मात्र शहरात डुकरांचा सुळसुळाट दिसून येतो.शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याबाबत वादळी चर्चा झाली. अतिक्रमण विभागाकडे एकच टेम्पो असल्याने अतिक्रमण हटविण्यास अडचण येत असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. पोलीस बंदोबस्त मिळत नाही. अतिक्रमणधारक अंगावर धावून येतात. यामुळे अधिकारी व कर्मचाºयांमध्ये भिती आहे. अतिक्रमण विभागाकडे कर्मचाºयांची कमतरता असल्यामुळे अतिक्रमण हटविण्यास मर्यादा पडत असल्याचे प्रशासनाने खुलासा केला. यानंतर विषय पत्रिकेवरील विषयांना सुरूवात झाली. रोशनी ट्रेडींग कन्स्ट्रक्शन व प्रज्ञा बिल्डकॉन यांची सिमेंट रस्त्याची निविदा मंजूर करण्यात आली. मुशावरत चौक व मोतीबागनाका भागात बीओटी तत्वावर व्यापारी गाळे उभारण्याचा करारनामा व कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे; मात्र या ठिकाणचे काही गाळेधारक गाळे खाली करत नसल्यामुळे काम रखडले असल्याचे शहर अभियंता कैलास बच्छाव यांनी सांगितले.येत्या ८ दिवसात जागा खाली करून ठेकेदाराला काम सुरू करण्याच्या सूचना द्याव्यात, असे स्थायी समिती सभापती बच्छाव यांनी सांगितले. उन्नती कन्स्ट्रक्शनचे जलवाहिनी दुरुस्तीची प्रभाग १ व प्रभाग २ साठीची निविदा मंजूर करण्यात आली आहे.दहा दिवसात निविदा काढण्याच्या सूचनाऔषध खरेदीच्या विषयावरुन सभापती बच्छाव, नगरसेवक सुनील गायकवाड, खालीद परवेझ, नारायण शिंदे आदिंनी प्रशासनाला धारेवर धरले. येत्या १० दिवसात जंतूनाशक खरेदीची निविदा काढण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. ठेकेदाराची चौकशी करुन बिले अदा करावीत, असेही सांगितले.
जंतूनाशक ठेका,अतिक्रमणावर वादळी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 12:08 AM