खर्डे : केंद्रीय जलशक्ती अभियानाच्या कमिटीने बुधवारी (दि.१७) रामेश्वर ,भावडे व पिंपंळगाव (वा ) येथील ग्रामपंचायतींना भेटी देऊन या गावातील पाझर तलाव ,वनतळे , वृक्ष लागवड आदी कामांची पाहणी केली .केंद्र शासनाने स्थापन केलेल्या जलशक्ती मंत्रालयाने जिल्ह्यातील देवळा तालुक्याची निवड केली आहे. कमिटीच्या सदस्यांनी तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेटी देण्यावर भर दिला असून , या कमिटीचा बुधवारी झालेला तिसरा दौरा होता. कमिटीने कापशी , खर्डे ,शेरी ,मटाने तसेच रामेश्वर ,भावडे व पिंपळगांव (वा ) येथील ग्रामपंचायतीना भेटी देऊन पाणी नियोजना संदर्भात स्थानिक अधिकाऱ्यांकडून माहिती करून घेतली . पाण्याचा थेंब न थेंब अडविण्याचा केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचा उद्देश असून , नाशिक जिल्ह्यातून निफाड ,सिन्नर व देवळा तालुक्याची या अभियानासाठी निवड करण्यात आली आहे. पाणी आडवा पाणी जिरवा आदींसह सरकारने राबविलेल्या सिंचन योजनांची माहिती केंद्रीय पथकाने घेतली . पथकाच्या अचानक दौºयामुळे आधिकारी ,कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. यावेळी तहसिलदार दत्तात्रेय शेजूळ , जि.प. स्थानिक स्तरच्या श्रीमती पाटील, कृषी विस्तार अधिकारी प्रशांत पवार आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी ,कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते .
देवळा तालुक्यातील गावांची केंद्रीय पथकाकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 6:32 PM
जलशक्ती अभियान : विविध गावांचा केला दौरा
ठळक मुद्देपाण्याचा थेंब न थेंब अडविण्याचा केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचा उद्देश