वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील वरखेडा, खेडगाव, बोपेगाव, शिंदवड, सोनजांब, जऊळकेवणी परिसरात रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह दोन तास मुसळधार पाऊस झाला. द्राक्ष, सोयाबीन, मका, टोमॅटो पिकांचे मोठे नुकसान झाले असून, आमदार नरहरी झिरवाळ, तहसीलदार बाबासाहेब गाढवे, निवासी नायब तहसीलदार आबासाहेब तांबे, तालुका कृषी अधिकारी अभिजित जमधङे, मंङळ अधिकारी साळी, तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक आदींनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.तालुक्यातील पूर्व भागात सुरुवातीला अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने नदी, नाले, तलाव कोरडेठाक होऊन विहिरींच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठी घट झाली आहे. अशा दुष्काळाच्या परिस्थितीत तालुक्यातील शेतकºयांचे नगदी पीक असलेल्या द्राक्षबागांना पोटच्या पोरासारखे विविध रोगराईपासून सांभाळत असताना अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, उत्पादनात मोठा फटका बसला आहे. द्राक्षबागांचा छाटणी हंगाम अखेरच्या टप्प्यात असताना अर्ली छाटणी झालेल्या द्राक्षबागा फुलोरा अवस्थेत आहेत.पावसामुळे फळकुज होऊन फक्त देठच शिल्लक राहिले आहेत, तर पोगा अवस्थेत असलेल्या द्राक्षाच्या बागेमध्ये घड जिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बहुतांश बागांचे नुकसानबहुतांश द्राक्षबागांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीत आलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकºयांची तारांबळ उडाली असून, मोठे नैसर्गिक संकट उभे राहिले आहे. शेतकºयांनी महागड्या औषधांची फवारणी करून द्राक्षबागा विविध रोगांपासून वाचविल्या; परंतु दोन तासात झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकºयांच्या द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या असून, नुकसानग्रस्त द्राक्षबागांचे पंचनामे करु न शेतकºयांना त्वरीत नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे.
नुकसानग्रस्त द्राक्षबागांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2018 12:19 AM
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील वरखेडा, खेडगाव, बोपेगाव, शिंदवड, सोनजांब, जऊळकेवणी परिसरात रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह दोन तास मुसळधार पाऊस झाला. द्राक्ष, सोयाबीन, मका, टोमॅटो पिकांचे मोठे नुकसान झाले असून, आमदार नरहरी झिरवाळ, तहसीलदार बाबासाहेब गाढवे, निवासी नायब तहसीलदार आबासाहेब तांबे, तालुका कृषी अधिकारी अभिजित जमधङे, मंङळ अधिकारी साळी, तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक आदींनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.
ठळक मुद्देखेडगाव परिसर : शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई देण्याची मागणी