बागलाण तालुक्यातील गारपीटग्रस्त भागाचा शुक्रवारी (दि. १९)कृषी मंत्री दादा भुसे यांनी दाैरा करत पाहणी केली. यावेळी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे आदि उपस्थित होते. अंबासन, ताहाराबाद, अंतापूर, मुल्हेर, पिंगळवाडे, करंजाड येथील नुकसानग्रस्त पिकांची भुसे यांनी पाहणी केली. या गारपीटने सर्वाधिक पाच हजार हेक्टर उन्हाळ कांद्याची हानी झाल्याची माहिती समोर आली असून, जिल्ह्यात बागलाण तालुक्यातच सर्वाधिक नुकसान झाल्याचे कृषी यंत्रणेने नमूद केले आहे. पाहणी दौऱ्यात संघाचे आबा बच्छाव, शिवसेना तालुकाप्रमुख सुभाष नंदन, लालचंद सोनवणे, रेखा पवार, सुनील गवळी ,मदन खैरणार, बंडू महाजन ,सुरेश गवळी ,विलास गवळी ,सीताराम साळवे ,अविनाश मानकर ,सचिन वाणी आदि उपस्थित होते.
इन्फो
बांधावर जाऊन घेतले नमुने
कृषी मंत्री भुसे व आमदार बोरसे यांनी पाहणी दौऱ्यात प्रत्यक्ष बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून नमुने घेतले. यावेळी महसूल, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना चार दिवसात पिकांचे पंचनामे करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेशही भुसे यांनी दिले. सदर नुकसानाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे ठेवून भरपाईसाठी भरीव निधी पदरात पाडून घेतला जाईल, असेही भुसे यांनी स्पष्ट केले.
फोटो - १९ दादा भुसे
बागलाण तालुक्यातील अंतापूर येथे गारपीटमुळे नुकसान झालेल्या कांदा पिकाची पाहणी करताना कृषी मंत्री दादा भुसे. समवेत आमदार दिलीप बोरसे यांच्यासह शेतकरी व अधिकारी.
===Photopath===
190221\19nsk_33_19022021_13.jpg
===Caption===
फोटो - १९ दादा भुसे बागलाण तालुक्याततील अंतापूर येथे गारपीटमुळे नुकसान झालेल्या कांदा पिकाची पाहणी करतांना कृषीमंत्री दादा भुसे. समवेत आमदार दिलीप बोरसे यांचेसह शेतकरी व अधिकारी.