सुरगाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळवण-सुरगाणा विधानसभेचे आमदार नितीन पवार यांनी ग्रामीण रु ग्णालयात आरोग्य सुविधांची पाहणी केली.आमदार पवार यांनी रु ग्णालयातील औषधसाठा, रु ग्णवाहिका, भौतिक सुविधांची उपलब्धता याबाबत माहिती जाणून घेतली. तहसीलदार विजय सूर्यवंशी, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, तालुका वैद्यकीय अधिकारी दिलीप रणवीर, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नागेश येवले, पोलीस निरीक्षक दिवानसिंग वसावे, रु ग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुले, डॉ. देशमुख, डॉ. पवार, पंचायत समितीचे कोरोना दक्षता समितीचे रामचंद्र झिरवाळ यांना अतिदक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच रु ग्णालयात उपचारासाठी अत्यावश्यक असलेले साहित्य तत्काळ उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.यावेळी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळत आमदार पवार यांच्यासमोर समस्यांचा पाऊस पाडला. शहरात गढूळ पाणपुरवठा होत असल्याची तक्र ार केली. नगरसेवक सचिन आहेर यांनी तालुक्यात गरीब आदिवासी जनतेकडे अजूनही दोन हजारांहून अधिक केशरी शिधापत्रिका आहेत. त्यामुळे खऱ्या गरजूंना धान्याचा लाभ मिळत नाही, अशी तक्रार केली. आदिवासी बचाव कृती समितीचे तालुका प्रमुख रतन चौधरी यांनी, तालुक्यात अजूनही अतिदुर्गम भागात पुरेशा प्रमाणात आरोग्य सुविधा नसल्याने आदिवासी बांधव आजार अंगावरच काढतात. ताप, सर्दी, खोकला झाल्यावर जडीबुटीचा वापर करतात. भगताकडे जातात यामुळे आरोग्य सुविधा पुरवावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. राज्याच्या हद्दीवरील गुजरात राज्यातील सीमा लाकडाउन असल्याने पिंपळसोंड येथील नागरिकांना पांगारणे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी जावे लागते. गुजरात राज्यातील दोन गावातून प्रवास करून परत महाराष्ट्रात जावे लागते. मात्र सीमाबंद असल्याने जाऊ दिले जात नाही. अशावेळी कठीण परिस्थितीला ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. तरी भविष्यात पिंपळसोंड येथेच प्राथमिक आरोग्य केंद्र शासनाने मंजूर करावे, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी रमेश थोरात, बाळासाहेब सूर्यवंशी, छोटू दवंडे, दिनकर पिंगळे, राजेंद्र पवार, मनोज शेजोळे आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 7:05 PM
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळवण-सुरगाणा विधानसभेचे आमदार नितीन पवार यांनी ग्रामीण रु ग्णालयात आरोग्य सुविधांची पाहणी केली.
ठळक मुद्देआढावा : नितीन पवार यांच्यासमोर नागरिकांकडून समस्यांचा पाऊस