यावेळी उपविभागीय क्रीडा कार्यालयाचे अधिकारी अरविंद चौधरी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. बंदिस्त सभागृहासाठी अडचणी येऊ नये, त्यासाठी काही बदलाच्या सूचनाही त्यांनी दिल्या. विद्यालयांमध्ये सुरू असलेल्या सामुदायिक योगा नैपुण्यप्राप्त खेळाडूंची त्यांनी माहिती घेत समाधान व्यक्त केले. क्रीडा खात्याकडून खेळाडूंसाठी मिळणाऱ्या विविध योजनांचीही त्यांनी यावेळी माहिती दिली. जास्तीत जास्त सुविधांचा उपयोग मुलांसाठी करून द्यावा, अशा सूचना केल्या. त्याच सोबत शालेय कामकाजाची व परिसराची पाहणी करून समाधान व्यक्त केले. मुख्याध्यापिका व्ही. पी. उकिरडे, पर्यवेक्षक व्ही. एन. शिंदे यांनी अतिथींचे स्वागत केले. याप्रसंगी उपशिक्षिका ए. जी. अहिरे, व्ही. टी. गायकवाड, एस. व्ही. ससाणे, डी. जी. हगवणे, क्रीडाशिक्षक व्ही. आर. गोसावी, आर. एम. कांगणे, एम. आर. रणदिवे, वरिष्ठ लिपिक निसाळ आदींसह शिक्षक उपस्थित होते.
विभागीय क्रीडा आयुक्तांकडून पांढुर्ली शाळेची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 4:14 AM