पेठ : तालुक्यातील विविध गावांना खासदार भारती पवार यांनी भेटी देऊन वीज, पाणी, रस्ते आदी नागरी समस्या जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.पेठ तालुक्यात दरवर्षी जानेवारीनंतर बहुतांश गावांना पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागतात. यासाठी जळे, झाडीपाडा परिसरातील बंधाऱ्यातील गाळ काढण्यासंदर्भात त्यांनी भेट देऊन पाहणी केली. शिराळे धरणाजवळ शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र रोहित्र बसवण्याची मागणी करण्यात आली. तसेच शिंगदरी, मानकापूर, तांदळाची बारी परिसरात रस्ते, फरशीपूल कामांची पाहणी करून नागरिकांशी चर्चा केली. यावेळी डॉ. प्रशांत भदाणे, पेठ प्रभारी उमेश काळे, शहराध्यक्ष त्र्यंबक कामडी, तालुका सरचिटणीस रमेश गालट, तालुका उपाध्यक्ष छगन चारोस्कर, प्रमोद शार्दुल, कहांडोळापाडाचे सरपंच कैलास भवरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
पेठ तालुक्यातील समस्यांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 11:32 PM
पेठ : तालुक्यातील विविध गावांना खासदार भारती पवार यांनी भेटी देऊन वीज, पाणी, रस्ते आदी नागरी समस्या जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
ठळक मुद्देबहुतांश गावांना पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागतात.