नाशिक : गेल्या ७५ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या रोटरी क्लब ऑफ नाशिक संस्थेने केवळ शहरातच नव्हे तर जिल्ह्याच्या ग्रामीण, आदिवासी, डोंगराळ भागात जाऊन समाजाची गरज ओळखून काम करताना आता थॅलेसिमियासारख्या गंभीर वळण घेत असलेल्या आजारातून समाजाची मुक्तता व्हावी यावर लक्ष केंद्रित केले असून या उपक्रमांतर्गत ब्ल्यू क्रॉस आणि पटूट संस्थेच्या सहकार्याने नाशिक जिल्ह्यातील विविध ४३ आश्रमशाळांतील तब्बल १० हजार विद्यार्थ्यांची मोफत थॅलेसिमिया तपासणी करण्यात आली आहे. थॅलेसिमिया एक रक्तजन्य अनुवांशिक रोग असून आई वडीलांकडून या रोगाचे संक्रमण अपत्यास होते. ‘थॅलेसिमिया मेजर’ या रोगाने पीडित मुले शरीरात रक्त कमी असल्या कारणाने पिवळी पडतात. भूक, वजन आणि शारीरिक हालचाल कमी असल्याने शारीरिक विकासही कमी होतो. शरीरात रक्ताची कमतरता असल्याने अशा रुग्णांना वेळोवेळी रक्तपुरवठा करण्याची गरज भासते. या रोगाचा उपचार अत्यंत कठीण आणि खर्चिक असून तो सर्वसामान्यांना न परवडणारा आहे. जिल्ह्यात या आजाराचे उपचार मोफत व्हावेत यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकने पुढाकार घेतला. यासाठी प्रति विद्यार्थी १०० रुपये एवढा खर्च आला. आतापर्यंत यापैकी १० हजार २०१ विद्यार्थ्यांची तपासणी पूर्ण झालेली असून, यापैकी १४९ विद्यार्थ्यांना थॅलेसिमिया माईनोर असल्याचे निदर्शनास आले असून ‘थॅलेसिमिया मुक्त नाशिक’ ही मोहीम यशस्वी करणयाच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे. 5ब6 थॅलेसिमिया माईनोर मुलगा आणि थॅलेसिमिया माईनोर मुलगी यांचा विवाह झाल्यास जन्माला येणारे मुल थॅलेसिमिया मेजर येण्याची जास्त शक्यता असते. परिणामी अशा व्यक्तींना दरमहा शरीरातील रक्त बदलावे लागते. शिवाय माईनोर मुलांचा इलाज बोनमॅरो ट्रान्सप्लांटसाठी सुमारे २५ लाखांपर्यंत खर्च येतो. प्रत्येक कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसते. हा खर्च सर्वसामान्य व्यक्तीला न परवडणारा असतो. या व्यतिरिक्त मानसिक त्रासही मोठा असतो. दरम्यान अशी वेळ दुर्दैवाने कोणावर येवू नये यासाठी ‘थॅलेसिमिया मुक्त नाशिक’ हि संकल्पना राबविण्यात आली. या उपक्रमासाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून जिल्ह्यातील १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची थॅलेसिमिया तपासणी करून पुढच्या पिढीत अडचणी येवू नयेत आणि आरोग्य चांगले राहावे यासाठी प्रयत्न करता आल्याचे रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष राधेय येवले यांनी सांगितले.
‘थॅलेसिमिया मुक्त नाशिक’ अभियानात जिल्ह्यातील १० हजार तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 2:06 PM
रोटरी क्लब ऑफ नाशिक संस्थेने थॅलेसिमियासारख्या गंभीर वळण घेत असलेल्या आजारातून समाजाची मुक्तता व्हावी यावर लक्ष केंद्रित केले असून या उपक्रमांतर्गत ब्ल्यू क्रॉस आणि पटूट संस्थेच्या सहकार्याने नाशिक जिल्ह्यातील विविध ४३ आश्रमशाळांतील तब्बल १० हजार विद्यार्थ्यांची मोफत थॅलेसिमिया तपासणी करण्यात आली आहे.
ठळक मुद्देरोटरी क्लब ऑफ नाशिकचे ‘थॅलेसिमिया मुक्त नाशिक’ अभियान जिल्ह्यातील १० हजार विद्यार्थ्यांची थॅलेसिमिया तपासणी