लोहोणेर : - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छग्राम स्पर्धा२०१८-१९ अंतर्गत देवळा तालुक्यातील खुंटेवाडी, विठेवाडी व चिंचवे या गावातील ग्रामपंचायतींसह परिसराची पाहणी बागलाण गटाच्या समिती पथकाकडून करण्यात आली . सदरच्या समितीने सांडपाणी व्यवस्थापन, पाणीपुरवठा, शौचालय यांसह ग्रामपंचायतीच्या अद्यावत दप्तराची पाहणी करीत कारभार जाणून घेतला तसेच गावातील विवध उपक्र मांची माहिती घेतली. पथकात ग्रामपंचायत विस्तार अधिकारी आर.एच.खैरनार, जयवंत भामरे, मुख्य सेविका श्रीमती देसाई, विस्तार अधिकारी एन.एन.पाटील, वैभव पाटील, जी.एस.पगार व महेश भामरे यांचा समावेश होता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेसाठी देवळा तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गटातून प्रथम आलेल्या प्रत्येकी एक अशा खुंटेवाडी, विठेवाडी व चिंचवे या ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे यातून एका ग्रामपंचायतीची जिल्हा स्तरावर निवड होणार आहे. खुंटेवाडी येथे पथकाने भेट दिली त्यावेळी सरपंच मीना निकम, उपसरपंच भाऊसाहेब पगार, भिला भामरे, मोठाभाऊ पगार, मुख्याध्यापक दादाजी खैरनार, योगेश सावकार, ग्रामसेविका पूनम सोनजे, अनिल भामरे, ज्ञानेश्वर भामरे आदी उपस्थित होते.