सातपूर : राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाच्या कर्मचाºयांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर मंगळवारी (दि.२७) जोरदार घोषणाबाजी करीत राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने केली. राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत (ईएसआय) असलेले कांदिवली येथील रुग्णालय राज्य कामगार विमा महामंडळाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेताना रुग्णालयात कार्यरत कर्मचाºयांना महाराष्ट्र शासनाने अंधारात ठेवल्याचा आरोप कर्मचाºयांनी केला असून सरकारच्या निर्णयाचे पडसाद नाशिकमध्येही उमटले आहेत. सातपूर येथील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाच्या कर्मचाºयांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी करीत निदर्शने केली. शासनाने रुग्णालय हस्तांतरित केले. मात्र कर्मचाºयांना योजनेतील इतर रुग्णालयात समाविष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रुग्णालयाबरोबरच कर्मचाºयांनाही महामंडळाकडे हस्तांतरित करावे, अशी मागणी कर्मचाºयांनी केली असून वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचारी व अधिकाºयांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे.
विमा योजना रुग्णालयासमोर कर्मचाºयांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 1:23 AM
सातपूर : राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाच्या कर्मचाºयांनी जोरदार घोषणाबाजी करीत राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने केली.
ठळक मुद्दे हस्तांतरित करण्याचा निर्णयप्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी