लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : उन्हाळी सुट्ट्यांमुळे नाशिकरोड रेल्वेस्थानकावर प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याने रेल्वे पोलिसांकडून गस्त वाढविण्यात आली आहे. तर शहर बॉम्बशोधक-नाशक पथकाकडून दररोज श्वान व साहित्यामार्फत तपासणी केली जात आहे.शाळा-महाविद्यालयांना उन्हाळी सुट्ट्या लागल्याने रेल्वेद्वारे बाहेरगावी येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दुपारनंतर लांब पल्ल्याच्या येणाऱ्या-जाणाऱ्या रेल्वे जादा प्रमाणात येत असल्याने रेल्वेस्थानक प्रवाशांच्या गर्दीने हाउस फुल्ल होऊन जात आहे. दुपारनंतर मध्यरात्रीपर्यंत प्रवाशांची रेल्वेस्थानकावर मोठ्या प्रमाणात रेलचेल असल्याने रेल्वेच्या काही विभागांवर कामाचा ताण वाढला आहे. प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे पोलीस यांच्याकडून खबरदारीचा उपाय म्हणून गस्त वाढविण्यात आली आहे. विशेष करून रेल्वे येण्याच्या अगोदर व गेल्यानंतर काही वेळ पोलिसांची रेल्वेस्थानक परिसरात पोलीस तैनात करण्यात आलेले असतात. त्यामुळे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
रेल्वेस्थानकात बॉम्बशोधक पथकाची तपासणी
By admin | Published: May 11, 2017 1:45 AM