शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

‘नार-पार’ची भामरेंकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 12:56 AM

मालेगाव : कसमादेसह गिरणा खोऱ्याचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी वांजुळपाणी मांजरपाडा-२ व चिराई वळण योजना मार्गी लावण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार असल्याचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी सांगितले.

ठळक मुद्देपाणीप्रश्न : चिराई वळण योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार

मालेगाव : कसमादेसह गिरणा खोऱ्याचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी वांजुळपाणी मांजरपाडा-२ व चिराई वळण योजना मार्गी लावण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार असल्याचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी सांगितले.डॉ. भामरे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व वांजुळपाणी संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी नार-पार खोºयाचा दौरा केला. नार-पार-अंबिका-औरंगा, नार-पार-ताण-मान नद्यांच्या जल स्रोतांची व उगमस्थानांची पाहणी केली. सुमारे ५ हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. गेल्या काही वर्षांपासून नार-पार-दमण-गंगा-वांजुळपाडा, मांजरपाड्याचा पाणीप्रश्न कसमादे परिसरात पेटला आहे. कसमादेसह उत्तर महाराष्टÑाच्या शेती सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा यासाठी शेतकरी आंदोलने करीत आहेत. केंद्र व राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वांजुळपाडा संघर्ष समितीने गेल्या आठ महिन्यांपासून कसमादे परिसरात जनजागृती सुरू केली आहे.भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष सुनील गायकवाड यांनी गेल्या महिन्यात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली होती. तर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री भामरे यांची भेट घेऊन प्रकल्प स्थळाविषयीमाहिती दिली होती. याची दखल घेत भामरे यांनी दौरा केला. सुरगाणा तालुक्यातील गिरणा नदीच्या उगमस्थानावर तसेच केम डोंगरावरील वांजुळपाणी योजनेच्या मुख्य ठिकाणाला अधीक्षक अभियंता एम. एस. आमले, कार्यकारी अभियंता पी. व्ही. मुसळे, उपअभियंता काकुळते आदी अधिकाºयांसह दौरा केला.यावेळी वांजुळपाणी येथे धरण बांधल्यास नैसर्गिक उताराने प्रवाही वळण पद्धतीने बोगदे व पाटचारीच्या माध्यमातून औरंगा-नार-पार-ताण-मान खोºयातील पाणी धरणात सोडता येईल. ५ टीएमसी पाणी याद्वारे उपलब्ध होऊन ते गिरणा नदीत सोडता येईल. तसेच गिरणा खोºयाचा पाणीप्रश्न निकाली निघेल, अशा आशयाचे निवेदन संघर्ष समितीने डॉ. भामरे यांना दिले.या दौºयात भाजपा जिल्हाध्यक्ष दादा जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष गायकवाड, माजी जि.प. सदस्य रत्नाकर पवार, लकी गिल, जि.प. सदस्य समाधान हिरे, नीलेश कचवे, सुरेश निकम, डॉ. विलासबच्छाव, जळगाव जि.प. अध्यक्ष उज्ज्वला पाटील, मच्छिंद्र पाटील, विवेक वारुळे, संदीप पाटील, प्रा. के. एन. अहिरे, प्रशांत पाटील, भडगाव कृउबाचे सभापती विश्वास पाटील, राजेंद्र शेलार, उमाकांत कदम आदींसह वांजुळपाडा संघर्ष समितीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.अल्पखर्चासाठी पाठपुरावातांत्रिकदृष्ट्या सोयीस्कर व अल्पखर्चाचा प्रकल्प राबविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून नार-पारसाठी निधी मिळवून या प्रकल्पाला मूर्त रूप दिले जाईल, अशी ग्वाही डॉ. सुभाष भामरे यांनी उपस्थितांना दिली.

टॅग्स :Damधरण