शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

प्रेरणादायी : शहीद दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कुटुंबे भारावली दिंडोरीत आजी, माजी सैनिकांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:01 AM

दिंडोरी : येथील अ‍ॅचिव्हर्स ग्रुप व जनता इंग्लिश स्कूलच्या वतीने हुतात्मा दिन शहीद दिन म्हणून साजरा करण्यात आला. तालुक्यातील शहीद जवान यशवंत ढाकणे (तळेगाव) व संदीप ठोक (सिन्नर) यांच्या आई-वडिलांचा तसेच माजी सैनिक व सध्या देशसेवेत कार्यरत असलेल्या सैनिकांचा सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देप्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलनविद्यार्थी यांची रॅली

दिंडोरी : येथील अ‍ॅचिव्हर्स ग्रुप व जनता इंग्लिश स्कूलच्या वतीने हुतात्मा दिन शहीद दिन म्हणून साजरा करण्यात आला. तालुक्यातील शहीद जवान यशवंत ढाकणे (तळेगाव) व संदीप ठोक (सिन्नर) यांच्या आई-वडिलांचा तसेच माजी सैनिक व सध्या देशसेवेत कार्यरत असलेल्या सैनिकांचा सत्कार करण्यात आला.दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक तथा प्राचार्य सी. बी. पवार उपस्थित होते.यावेळी पवार म्हणाले, अ‍ॅचिव्हर्स ग्रुपने युवकांना मार्गदर्शन करून देशसेवेसाठी प्रेरणा द्यावी व युवकांना सैन्यदलात भरती होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती, महात्मा गांधी व शहीद यशवंत ढाकणे यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष भाऊसाहेब बोरस्ते, कृउबा समिती उपसभापती अनिल देशमुख, डॉ. विलास देशमुख, शहीद ढाकणे यांचे वडील अर्जुन ढाकणे, शहीद ठोक यांचे वडील सोमनाथ ठोक, दिंडोरी तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष शंकरराव कापसे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी देशसेवेसाठी प्राणाची आहुती दिलेल्या व शहीद झालेल्या सैनिकांना दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. ग्रुपच्या वतीने शहीद दिनानिमित्त शहरातून माजी सैनिक, ग्रुपचे विद्यार्थी व शाळेचे विद्यार्थी यांची रॅली काढण्यात आली. रॅलीच्या सर्वात पुढे चालणाºया जीपवर तिरंगी झेंडा लावण्यात येऊन देशभक्तीपर गीते लावण्यात आले होते. ही रॅली सर्वांचे आकर्षण ठरली. संतोष कथार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी धनंजय जाधव, सागर वानखेडे, सिद्धार्थ पगारे, अक्षय चारोस्कर उपस्थित होते. महेश खुळे यांनी सूत्रसंचालन केले. सागर वानखेडे यांनी आभार मानले.रांगोळी सर्वांचे आकर्षणअ‍ॅचिव्हर्स ग्रुपच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते अर्जुन ढाकणे व सोमनाथ ठोक यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी तालुक्यातील २१ माजी सैनिक, देशातील विविध राज्यांत देशसेवेचे कर्तव्य बजावत असणाºया ५५ सैनिकांच्या कुटुंबांचा व सैनिकांचा ग्रुपच्या वतीने रोप देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाने सैनिकी कुटुंबे भारावून गेली होती. ग्रुपच्या वतीने मैदानावर सैनिकांच्या बंदुकीची प्रतिकृती रेखाटली होती, ती रांगोळी सर्वांचे आकर्षण ठरली.