नाशिक : येथील इनरव्हील क्लब आॅफ जेन नेक्स्ट यांच्या वतीने ‘मी आणि माझे आर्थिक स्वातंत्र्य’ या विषयावर सातपूर येथील नाईस हॉल, नाईस संकुल येथे आयोजित मोफत मार्गदर्शन शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी नागपूर येथील इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट चेअरमॅन गौरी धोंड यांनी महिलांना मार्गदर्शन केले. मुंबई येथील बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे वरिष्ठ अधिकारी वासुदेवन यांनी उपस्थित महिलांना आर्थिक नियोजनावर माहिती दिली. त्यानंतर पुणे येथील कार्वी फायनान्शियल सर्व्हिसेसचे सम्राट जाधव यांनी विविध विषयांवर महिलांसोबत चर्चा करीत आपले मनोगत व्यक्त केले. भावेश शर्मा, मुंबई यांनी म्युच्युअल फंडवर माहिती दिली. शिबिरात दोनशेहून अधिक महिला उपस्थित होत्या. याप्रसंगी सरोज दशपुते यांनी इनरव्हील क्लब आॅफ जेन नेक्स्टच्या माध्यमातून होणाऱ्या जनसेवेची माहिती दिली. याप्रसंगी सुरेखा महाले, स्वाती दुर्वे, योगेश बमबार्डेकर, अजित मंजुरे, राजन लोंढे. डॉ. रुपाली खैरे आदी उपस्थित होते.
इनरव्हील शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:36 AM