मालेगाव : मालेगाव शहर परिसरात विविध मंडळांसह बालगोपाळांनी मोठ्या उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणात गणरायाच्या मूर्तीची मिरवणूक काढून त्यांची प्रतिष्ठापना केली. शहर व परिसरात ढोल, ताशांच्या गजरात, सजविलेल्या रथावरून गुलालाची उधळण करीत मिरवणूक काढीत गणरायांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. सार्वजनिक गणेश मंडळासह घरोघरी श्रींची स्थापना करण्यात आली.श्रींच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर भगवे झेंडे, कमानींनी सजविण्यात आले असून रंगीबेरंगी विद्युत रोषणाई भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. श्रींच्या प्रतिष्ठापनेसाठी गेल्या काही दिवसांपासून मंडळांच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून त्यानिमित्त घेण्यात येणाºया कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. सकाळपासूनच बालगोपाळांसह लहान व मोठ्या अशा सुमारे ७०० मंडळामध्ये गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या गजरात श्रीगणरायांची स्थापना करण्यात आली. शहरात दिवसभर उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण होते. गणेशमूर्तीसह पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी महिलांसह भाविकांनी मोसमपूल, सटाणानाका आणि कॅम्प परिसरात सकाळपासूनच बाजारपेठेत गर्दी केली होती.शहरातील गूळबाजार, संगमेश्वर, मोसमपूल, सटाणानाका, रावळगाव नाका जुना आग्रा रस्ता, कॅम्प सोमवार बाजार - रावळगावनाका आदी भागात श्री मूर्तीसह स्थापनेसाठी लागणारे पूजेचे साहित्य, दुर्वा - हारफुले, जास्वंदीची फुले, सजावटीच्या साहित्याची दुकाने सजली होती. तयार मोदक व तयार सजावटीचे साहित्य याचीही खरेदी वाढली होती. मिठाईच्या दुकानात प्रसाद म्हणून विविध प्रकारच्या मिठाईची खरेदी झाली. शहर - तालुक्यातील विविध लहान - मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांनी आधीच पसंतीच्या श्रीगणेश मूर्तींची आगाऊ नोंदणी मूर्तिकाराकडे करुन ठेवलेली होती. त्यामुळे मंडळाच्या पदाधिकाºयांची सकाळपासून मूर्ती वाहनांद्वारे घेऊन जाण्यासाठी धावपळ सुरू होती. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने भाविकांच्या चेहºयावरील आनंद ओसंडून वाहत होता. यंदा श्रींचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपअधीक्षक गजानन राजमाने, अजित हगवणे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.वाढीव बंदोबस्त तैनातआझादनगर : आजपासून साजरा होणाºया गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस सज्ज झाले असून स्थानिक पोलीस बळाच्या दिमतीला अतिरिक्त १५० पोलीस, एक राज्य राखीव दलाची तुकडी व ५०० गृहरक्षक दलाचे जवान असा वाढीव बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आला आहे. आज दुपारी एकच्या दरम्यान शहरातून पोलिसांनी संचलन करण्यात आले आहे. आज शहरात श्रीगणेशाचे उत्साहात स्थापना करण्यात आली. शहरातील एकूण २४९ गणेश मंडळांसह प्रत्येक घरात गणेशाची स्थापना करण्यात आली. आजपासून गणेशोत्सवास होणारा प्रारंभ व आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात वाढीव पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात स्थानिक पोलीस दलाच्या मदतीला १५० पोलीस अधिकारी व कर्मचारी, राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या, ५०० गृहरक्षक दलाचे जवानांचा समावेश आहे. आज दुपारी साडेबारा वाजता पोलीस नियंत्रण कक्ष येथून किदवाई रस्ता, पेरीचौक, जामा मशीद, संगमेश्वर व मोसमपूलमार्गे छावणी पोलीस ठाण्यापर्यंत पोलिसांचे संचलन पार पडले. आगामी सणोत्सव काळात कुठल्याही संशयास्पद वस्तू वा व्यक्ती आढळून आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. गणेशोत्सव व बकरी ईद शांततेत साजरी करावे, असे आवाहन शहर पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.
गणरायाची जल्लोषात प्रतिष्ठापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:47 AM