खडकी : इंधन भरण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना पेट्रोलपंपावर दिल्या जाणाºया सेवासुविधांचा परिसरात पुरता बोजवारा उडाला आहे. संबंधित अधिकारी व निरीक्षकांच्या हलगर्जीपणामुळे विक्रेत्यांच्या मनमानी कारभाराला आळा घालावा, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.परिसरातील अनेक पेट्रोल-पंपांवरील हवा तपासणी यंत्रच बंद आहे. आजच्या युगात दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नागरिकांच्या दळणवळणाच्या सुविधा वाढल्या असल्या तरी अपघातांचेही प्रमाण वाढले आहे. शासनाने सुरक्षेच्या दृष्टीने ेयोग्य पावले उचलली आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी काळजीपूर्वक होत नसल्याने सुविधा असून नसल्यासारख्या आहेत. वाहनांना चालणा देणाºया इंधनाची सोय दर दोन किलोमीटरला पेट्रोलपंपाची व्यवस्था झाली आहे. इंधन भरणाºया ग्राहकांना विक्रेत्यांतर्फे देण्यात येणाºया सुविधा सेवेत टायरची हवा तपासणी, प्रथमोपचार सेवा दर फलक आदी सेवा शासनाने अनिवार्य केल्या आहेत. सदर सुविधा पंप नव्यानव्याने सुरू ठेवतात, मात्र त्याचे सातत्य ठेवले जात नसल्याने सुविधा असून डोळेझाक करावी लागत आहे.प्रत्येक पेट्रोलपंपावरील हवा तपासणी यंत्र सांगायला निमित्त मात्र उभे केलेले आहे. प्रथमोपचाराचा स्टॉल देखील दिसून येत नाही. ग्राहकांना नुसते इंधन भरण्याचे भुरळ पाडणाºया जाहिरातीचे फलक नजरेस पडते. यामुळे या सेवेला आळा घालण्याची यंत्रणा सुरू झाल्याने नुसता तक्रार दुरुस्ती क्रमांक वापरून समस्या सोडविण्याचे औपचारिकता महत्वपूर्ण ठरत आहे. इंधन भरताना ग्राहकांना पुरेशी माहिती विचारताना कर्मचारी अरेरावी करतात. दर्शक यंत्र वेळेपूर्वीच चालू किंवा बंद केले जात असल्याने टाकीत किती पेट्रोल गेले याची माहिती फक्त पेट्रोल विक्रेता व त्यांचे कर्मचारी यांनाच ठाऊक असते. शहरी भागासह ग्रामीण भागातही वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ग्रामीण भागातही मिनी पेट्रोलपंप सुरू केल्यास काळाबाजारही बंद होणार आहे. पेट्रोल ऐनवेळी संपले की ५० रुपयात २० ते ३० मिली लीटर पेट्रोल मिळते. यामुळे या धंद्याचाही ग्रामीण भागात सुळसुळाट झाला आहे. इंधन ही वस्तू अत्यावश्यक असल्याने इंधनाच्या सुविधा प्रत्येक गावात उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहे. यादृष्टीने कायदेशीरपणे शासनाला कर मिळून बेरोजगाराला रोजगार मिळणार आहे. वाहनांच्या टायरमधील हवा मर्यादित असली तर अपघातांचे प्रमाण कमी होणार आहे. यासाठी पेट्रोलपंपावरील सेवेला चालना देऊन ग्राहकांना हवा तपासणी अनिवार्य करणे गरजेचे आहे. हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी पूर्णपणे होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे पूरक सुविधा सेवा ही महत्त्वपूर्ण असल्याने ग्राहकांना सुरक्षितता व समाधान मिळणार आहे.
पेट्रोलपंपांवरील सेवासुविधांचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 10:48 PM
इंधन भरण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना पेट्रोलपंपावर दिल्या जाणाºया सेवासुविधांचा परिसरात पुरता बोजवारा उडाला आहे. संबंधित अधिकारी व निरीक्षकांच्या हलगर्जीपणामुळे विक्रेत्यांच्या मनमानी कारभाराला आळा घालावा, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.
ठळक मुद्देखडकी : अधिकारी व निरीक्षकांच्या हलगर्जीपणाचा ग्राहकांना फटका