काेरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात असल्यामुळे गणेशोत्सवासाठी प्रशासनाने नियमावली कडक केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी मंडपाची लांबी रूंदी, गणेश मूर्तीची उंची, देखावे, मिरवणुकांवर बंदी असे नियम घालताना प्रशासनाने यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
कोरोनाची लाट येण्यापूर्वी नाशिक शहरात गणेशोत्सवाची मोठी लगबग अन् उत्साह पहावयास मिळत होता. लहान मोठे जवळपास आठशे पेक्षा अधिक गणेश मंडळांचा गणेशोत्सवात सहभाग असायचा. यावर्षी मात्र संख्या प्रचंड घटली आहे. शहर व परिसरात केवळ ३५ सोसायट्यांमध्ये गणेशोत्सव मंडळांना पोलिसांकडून परवानगी देण्यात आली आहे.
--इन्फो--
आयुक्तालयात एक खिडकी योजना
गणेश मंडळांना परवानगीसाठी गैरसोय होऊ नये, याकरिता पोलीस आयुक्तालयात एक खिडकी योजना सुरू करण्यात आली. त्याद्वारे आलेल्या अर्जांना परवानगी देण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत २१५ लहान-मोठी गणेश मंडळे तर, ३५ सोसायटी मधील गणेश मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. अद्यापही प्रक्रिया सुरुच आहे. दरम्यान, गणेश मंडळांची संख्या कमी झाली. त्यामुळे मौल्यवान गणेश मंडळे ही कमी झाली आहेत.