कॉँग्रेसची उमेदवारीचा घोळ, शाहु खैरे यांच्या ऐवजी डॉ. हेमलता पाटील यांच्या गळ्यात माळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 05:10 PM2019-10-04T17:10:00+5:302019-10-04T17:13:30+5:30
नाशिक- मध्य नाशिक मतदार संघात आधी उमेदवारीसाठी स्पर्धा करणाऱ्या कॉँग्रेस पक्षात मात्र माघारीसाठी दोन दिवसांपासून स्पर्धा सुरू झाली. आधी कॉँग्रेस गटनेता शाहु खैरे यांना उमेदवारी घोषीत करण्यात आली, मात्र त्यांनी नकार दिल्याने ऐनेवळी प्रदेश प्रवक्तया डॉ. हेमलता पाटील यांच्या गळ्यात माळ घालण्यात आली. पक्षादेश म्हणून त्यांनी दुपारी ऐनवेळी उमेदवारी अर्ज दाखल केला.

कॉँग्रेस पक्षाच्या वतीने मध्य नाशिकमधून उमेदवारी करण्यासाठी चार जण इच्छूक होते. त्यांच्यात जोरदार स्पर्धा सुरू होती.मात्र ऐनवेळी उमेदवारी घोषीत झाल्यानंतर मात्र वातावरण बदलले. गुरूवारी मध्यरात्री पक्षाने उमेदवारी यादी घोषीत केली तेव्हा शाहु खैरे यांना उमेदवारी दिली. मात्र त्यांनी उमेदवारीस नकार दिल्याचे समजते. त्यामुळे नगरसेवक राहूल दिवे आणि प्रदेश प्रवक्तया डॉ. हेमलता पाटील यांना विचारणा करून नंतर त्यांनाच ही उमेदवारी देण्यात आली. दुपारी ऐनवेळी डॉ. पाटील यांनी अर्ज दाखल केला.