मालेगाव : खरिपाच्या संदर्भात पेरणीचे पूर्ण नियोजन झाले असून, त्यानुसार कामकाज झाले आहे. त्याबरोबर खते व निविष्ठांची कुठेही टंचाई भासणार नाही. काही शेतकऱ्यांच्या खतांबाबत अडचणी होत्या, त्यासंदर्भात संबंधित क्षेत्रीय अधिकाºयांना सूचना देण्यात आल्या आहेत. खते व निविष्ठांची साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करणाºयांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही कृषी सचिव एकनाथ डवले यांनी यावेळी दिले.तालुक्यातील टेहरे शिवारातील शेतकºयांच्या बांधावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी संजीव पडवळ, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी अशोक पवार, डाळिंब संशोधन केंद्राचे प्रभारी डॉ. सचिन हिरे, कृषी विज्ञान केंद्रप्रमुख अमित पाटील, कीटकशास्र विभागाचे विशाल चौधरी, कृषी अधिकारी भास्कर जाधव, मंडळ कृषी अधिकारी अशोक गिरगुणे, गणपत शिंदे, रमेश पवार, पूनम दामोदर, शैलेंद्र वाघ यांच्यासह कृषी विभागाचे कर्मचारी व समूह पद्धतीने कृषी विस्तार कार्यक्रमासाठी निवड करण्यात आलेले शेतकरी उपस्थित होते.यावेळी डवले म्हणाले, उत्पादकता, गुणवत्ता व शेतकºयांचे उत्पन्नवाढ अशी त्रिसूत्री घेऊन, शेतकºयाच्या बांधावर जाऊन, त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा उपक्रम कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. कृषी संजीवनी सप्ताहात अशा उपक्रमांच्या माध्यमातून बळिराजाच्या सक्षमीकरणास नक्कीच मदत होईल असा विश्वास डवले यांनी व्यक्त केला.सायने व पाडळदे येथील शेतकºयांच्या बांधावर दीपक मालपुरे यांच्या माध्यमातून आरसीएफ कंपनीच्या खतांच्या३७० बॅगांचे ६० शेतकºयांना वाटप करण्यात आले. मालेगाव उपविभागात शेतकºयांचे आॅनलाइन प्रशिक्षण, शेतीशाळा, कृषी विभागाच्या विविध योजनांची प्रचार व प्रसिद्धी, सेंद्रिय शेतीमधील विविध बाबींची प्रात्यक्षिके घेणे इत्यादी उपक्रम राबविण्यात येत आहे.लोकमतच्या स्टिंग आॅपरेशनची दखलराज्य शासनातर्फे बांधावर खते-बियाणांचा पुरवठा तर दूरच उलट युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण करून त्याची मागील दाराने चढ्या दराने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी शेतकºयांनी मांडल्याचे वास्तव दि. ३ जुलै रोजी ‘लोकमत’मध्ये ‘शेतकरी बांधावरून कृषी सेवा केंद्रांवर’ या मथळ्याखाली प्रसिद्ध करण्यात आले होते.फळ पीक विमा योजनेबद्दल माहिती देत, कांदा पिकासाठी ठिबक सिंचनाचे महत्त्व आणि उत्पादन कसे वाढविता येईल याबद्दल कृषी आयुक्त डवले यांनी शेतकºयांशी चर्चा केली. शेतकºयांनी नाफेडमार्फत शासकीय खरेदीसाठी प्राधान्य देण्याबाबत मागणी केली. डाळिंब आणि द्राक्षे पिकांबद्दल शेतकºयांची मते जाणून घेतली.
खतांची कृत्रिम टंचाई करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 10:40 PM
खरिपाच्या संदर्भात पेरणीचे पूर्ण नियोजन झाले असून, त्यानुसार कामकाज झाले आहे. त्याबरोबर खते व निविष्ठांची कुठेही टंचाई भासणार नाही. काही शेतकऱ्यांच्या खतांबाबत अडचणी होत्या, त्यासंदर्भात संबंधित क्षेत्रीय अधिकाºयांना सूचना देण्यात आल्या आहेत. खते व निविष्ठांची साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करणाºयांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही कृषी सचिव एकनाथ डवले यांनी यावेळी दिले.
ठळक मुद्देएकनाथ डवले : टेहरेत कार्यक्रम; कृषी सप्ताहाच्या माध्यमातून शेतकरी सक्षमीकरणास होणार मदत