बूथनिहाय कार्यकर्ते नेमण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 12:33 AM2019-01-08T00:33:17+5:302019-01-08T00:33:32+5:30
नाशिक शहर काँग्रेसच्या वतीने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने बूथ कमिटी व शहर काँग्रेसच्या विविध फ्रंटल सेल यांच्या ब्लॉक कार्याचा आढावा घेण्याच्या दृष्टीने अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव व उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी चेल्लर वामसीचांद रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी तातडीची बैठक घेण्यात येऊन येत्या २१ जानेवारीपर्यंत प्रत्येक बूथनिहाय कार्यकर्ते नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या.
नाशिक : नाशिक शहर काँग्रेसच्या वतीने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने बूथ कमिटी व शहर काँग्रेसच्या विविध फ्रंटल सेल यांच्या ब्लॉक कार्याचा आढावा घेण्याच्या दृष्टीने अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव व उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी चेल्लर वामसीचांद रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी तातडीची बैठक घेण्यात येऊन येत्या २१ जानेवारीपर्यंत प्रत्येक बूथनिहाय कार्यकर्ते नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या.
कॉँग्रेस कमिटीत झालेल्या या बैठकीत प्रभारी रेड्डी यांनी, बूथस्तरावर कॉँग्रेस संघटन मजबूत करण्याच्या हेतूने ब्लॉकनिहाय प्रभारी अध्यक्ष नेमून त्यांनी तत्काळ बूथ कमिट्या गठित करणे तसेच ब्लॉकच्या रिक्त असलेल्या पदांवर तत्काळ कार्यकर्त्यांच्या नेमणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले असून, २१ जानेवारीपर्यंत या संदर्भातील सर्व माहिती अखिल भारतीय कॉँग्रेसला कळविण्याचे आवाहन त्यांनी केले. ब्लॉक प्रभारी व ब्लॉक अध्यक्ष यांनी एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना देण्याबरोबर प्रत्येक फ्रंटल सेलला प्रभारी नेमण्याच्या सूचना केल्या आहेत.
यावेळी बोलताना शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर यांनी शहर कार्यकारिणी व विविध प्रभारींच्या नेमणुका केल्या असून, फ्रंटल सेलचे रिक्त जागांचे प्रस्ताव प्रदेश कार्यालयात पाठविण्यात आल्याचे सांगितले. सर्व फ्रंटल सेलच्या कार्यकारिणी व बूथप्रमुखांच्या नेमणुकादेखील तत्काळ पूर्ण करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, शाहू खैरे, डॉ. हेमलता पाटील, अश्विनी बोरस्ते, वत्सला खैरे, आशा तडवी, विमल पाटील, समीर कांबळे, हनीफ बशीर, डॉ. वसंत ठाकूर, स्वप्नील पाटील, लक्ष्मण जायभावे, रईस शेख, सिरोजोद्दिन जीन, रमेश पवार, आर. आर. पाटील, उल्हास सातभाई आदी उपस्थित होते.