जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पाहणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी देवळा व सटाणा तालुक्यांतील रुग्णालयांना भेटी देऊन तेथील कोरोनास्थितीचा आढावा घेतला. यावेळी मांढरे यांनी सांगितले, सामान्य रुग्णालयातील २० केएल ऑक्सिजन टँकमार्फत ऑक्सिजनचा योग्य पद्धतीने व सुरळीत पुरवठा होण्यासाठी नियोजन करण्यात यावे, तसेच जिल्ह्यात शासकीय कोविड रुग्णालयातील व्हेंटिलेटर, ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर आणि नियोजित केलेले ऑक्सिजन जनरेशन प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करावे. त्याचप्रमाणे सामान्य रुग्णालयात ग्रामीण भागातील रुग्णांसाठी १५० खाटांची व्यवस्था करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. जिल्हा रुग्णालयाचे फायर ऑडिटचे काम पूर्ण झाले असून, त्याचा प्रस्ताव संचालक आरोग्यसेवा यांच्याकडे गेला आहे. आगामी दोन दिवसांत जिल्हा रुग्णालयामध्ये फायर मॉक ड्रील ठेवण्यात यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिल्या.
इन्फो
रेमडेसिविरच्या वापराबाबत तफावत
जिल्हाधिकाऱ्यांनी देवळा ग्रामीण रुग्णालय व डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरला (डी.सी.एच.सी.) भेट देऊन तेथील रुग्णांसोबत संवाद साधला. दोन्ही तालुक्यांतील दोन खासगी रुग्णालयांना जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली व तेथील रेमडेसिविर वापराबाबत व ऑक्सिजनच्या वापराबाबत पडताळणी केली. सटाणा तालुक्यातील एका खाजगी दवाखान्यातील रेमडेसिविरच्या वापराबाबत तफावत आढळून आल्यामुळे या रुग्णालयाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांना दिले.
फोटो - ०५ कलेक्टर मीटिंग