नाशिक : उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरच्या दिवशी प्रचंड गर्दी झाल्याने निवडणूक शाखेकडून उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सातत्याने सूचना केल्या जात होत्या. विशेषत: अर्ज दाखल करण्याचा अवधी किती राहिला याबाबतची माहिती ध्वनिक्षेपकावरून दिली जात होती.दुपारी २ वाजेपासून दर अर्ध्या तासाने ध्वनिक्षेपकावरून इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करण्याबाबतचे आवाहन केले जात होते. पावणेतीन वाजेपासून दर पाच मिनिटांनी काउंटडाउन करण्यातआले आणि तीन वाजल्यानंतर अर्ज दाखल करण्याची वेळसमाप्त झाल्याची उद्घोषणाही करण्यात आली. विशेषत: नाशिक पश्चिम आणि पूर्व मतदारसंघातून अर्ज दाखल करण्यासाठी मोठीगर्दी झाल्याने या दोन्ही ठिकाणी प्राधान्याने उद्घोषणा केली जात होती.
निवडणूक शाखेकडून ध्वनिक्षेपकावरून सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 1:24 AM