शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

‘त्या’ कांदा व्यापायावर कारवाईचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:07 AM

कांदा विक्रीचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाºया मुंगसे येथील कांदा खरेदी केंद्रावरील जय भोले ट्रेडर्स कंपनीच्या कांदा व्यापाºयावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पणन विभागाने येथील बाजार समिती प्रशासनाला दिले आहेत.

ठळक मुद्दे कांदा विक्रीचे पैसे देण्यास टाळाटाळथकीत रकमेपोटी ३० लाख रुपयांचे वाटप केले शेतकºयांनी संयम ठेवून बाजार समिती प्रशासनाला सहकार्य करावे,

मालेगाव : कांदा विक्रीचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाºया मुंगसे येथील कांदा खरेदी केंद्रावरील जय भोले ट्रेडर्स कंपनीच्या कांदा व्यापाºयावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पणन विभागाने येथील बाजार समिती प्रशासनाला दिले आहेत.  बाजार समिती प्रशासनाने गेल्या दोन दिवसात थकीत रकमेपोटी ३० लाख रुपयांचे वाटप केले आहे. मात्र याप्रश्नी शेतकरी आक्रमक झाले आहेत. बाजार समिती प्रशासनाची या प्रकारामुळे चांगलीच धावपळ उडाली आहे.मुंगसे कांदा खरेदीवरील जय भोले ट्रेडर्स कंपनीचे शिवाजी सूर्यवंशी यांनी शेतकºयांचा कांदा खरेदी केला. मात्र त्यापोटी दिलेले धनादेश बॅँकेत वटले नाहीत. यामुळे शेतकºयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. गुरुवारी आंदोलनदेखील करण्यात आले. या पार्श्वभूमीवर बाजार समिती प्रशासनाने नियोजन केले आहे. आतापर्यंत तीन टप्प्यात एक कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. गुरुवारी सायंकाळ-पर्यंत २२ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले होते. शुक्रवारी उर्वरित आठ लाख रुपये असे एकूण ३० लाख रुपये शेतकºयांना अदा करण्यात आले आहेत.  डिसेंबर महिन्यात ज्या शेतकºयांनी कांदा विकला आहे अशा शेतकºयांना पैसे अदा केले जाणार आहेत. शेतकºयांना पैशांचे वाटप केले जाणार आहे. संबंधित शेतकºयांनी संयम ठेवून बाजार समिती प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, बंडू बच्छाव, सचिव अशोक देसले आदींनी केले आहे.  पैसे अदा न केल्यास मालमत्ता जप्तीचे आदेश  शेतकºयांना वेठीस धरणाºया व्यापाºयावर कारवाई करण्याचे निर्देश पणन विभागाने दिले आहेत. संबंधित व्यापाºयाने वेळेत पैसे अदा न केल्यास त्याची मालमत्ता जप्त करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.४शेतमाल विक्री करणाºया शेतकºयास त्याच दिवसाचा धनादेश देणे गरजेचे असताना व्यापारी सूर्यवंशी यांनी पुढील एक महिन्याचा धनादेश दिले आहेत. दिलेले धनादेशही वटत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.व्यापारी सूर्यवंशी यांनी नाशिक व बांगलादेश येथील व्यापाºयाला कांदा विकला  आहे. संबंधित कांदा खरेदीदार व्यापाºयाकडे बाजार समितीचे कर्मचारी व सूर्यवंशी यांचा प्रतिनिधी जाऊन पैसे आणण्याचे नियोजन करण्यात आलेआहे.

टॅग्स :onionकांदा