संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाची अधिक शक्यता असल्याने शहरातील नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात आणि प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतीने गावागावांत विलगीकरण कक्ष सज्ज ठेवावे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालय अथवा इंडिया बुल्स कोविड सेंटरवर अतिरिक्त ताण येणार नाही, अशा सूचना आमदार कोकाटे यांनी दिल्या. लहान मुलांमध्ये आजार बळावल्यास त्यांच्यासोबत रुग्णालयात पालकांना थांबावे लागेल. त्यावेळी होणारी परवड मोठी असेल. हे टाळण्यासाठी सर्वेक्षण करावे. सौम्य लक्षणे आढळल्यास गावातील विलगीकरण केंद्रातच डॉक्टरांनी उपचार करावेत. म्हणजे पालकांना गावातल्या गावात थांबणे सोयीचे होईल. याबाबत आरोग्य विभागाने नगरसेवकांसोबत बैठक घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी प्रांताधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, नोडल अधिकारी डॉ. लहू पाटील आदी उपस्थित होते.
इन्फो
खासगी बालरोगतज्ज्ञांची मदत
लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास किंवा अशा रुग्णांची संख्या वाढल्यास शहर व तालुक्यातील खासगी बालरोगतज्ज्ञांची मदत घ्यावी, अशी सूचना आमदार कोकाटे यांनी केली. तथापि, सहा खासगी बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांची बैठक घेण्यात आलेली आहे. त्यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बच्छाव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. लहाडे यांनी दिली.
इन्फो
ग्रामीण रुग्णालयात चार वॉर्ड राखीव
ग्रामीण रुग्णालयात एक्सरे मशीन उपलब्ध आहे. मात्र, त्यासाठी डेव्हलपर आणि प्रिंटर उपलब्ध नसल्याची माहिती मिळताच आमदार कोकाटे यांनी पाहणी करून सीएसआर फंडातून सदर उपकरणे उपलब्ध करण्याची ग्वाही दिली. रुग्णालयात चार वॉर्ड लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत, याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. लहाडे यांनी माहिती दिली.
फोटो- २६ सिन्नर कोकाटे
सिन्नर ग्रामीण रुग्णालयाच्या सज्जतेबाबत अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे यांच्याशी चर्चा करताना आमदार माणिकराव कोकाटे. समवेत तहसीलदार राहुल कोताडे.
===Photopath===
260521\26nsk_26_26052021_13.jpg
===Caption===
फोटो- २६ सिन्नर कोकाटे सिन्नर ग्रामीण रुग्णालयाच्या सज्जतेबाबत अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे यांच्याशी चर्चा करताना आमदार माणिकराव कोकाटे. समवेत तहसीलदार राहुल कोताडे.