कळवण : पुनंद प्रकल्प अंतर्गत चणकापूर उजवा कालवा पोखऱ्या डोंगरांजवळ २३ कि.मी. अंतरावर नवीबेज शिवारात फुटल्यामुळे कालव्यातून लाखो लिटर पाणी वाया गेल्यामुळे नाल्याद्वारे वाहणारे पाणी शेतपिकांमध्ये घुसल्यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आमदार नितीन पवार यांनी भेट घेतली. कालवा फुटल्यामुळे झालेल्या नुकसानीची माहिती शेतकऱ्यांकडून घेऊन शासन निर्देशानुसार नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार पवार यांनी देऊन चणकापूर उजवा कालव्यावर नियंत्रण असणारे गिरणा नदी खोरे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राहुल पाटील यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निदर्शनास आणून देत भरपाई मिळवून देण्यासाठी शासनाला अहवाल सादर करण्याची सूचना केली. कालवा फुटल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्यामुळे प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा वस्तुनिष्ठ पंचनामा महसूल विभागाकडून करून घेण्याची सूचना आमदार नितीन पवार यांनी पुनंद प्रकल्पाचे उपअभियंता विजय टिळे यांना यावेळी केली. पंचनाम्यापासून कोणीही वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे सांगितले. कालवा फुटला त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करा, पूरपाणी बंद झाल्यानंतर कालव्याची दुरुस्ती करण्याची सूचना आमदार पवार यांनी यावेळी केली. यावेळी राजेंद्र शिंदे, रामकृष्ण पगार, रामदास पगार, नंदकुमार पगार, उमेश पगार, भावराव पगार, संतोष पगार, सागर शिंदे, रोशन पगार,पंकज शिंदे, जितेंद्र शिंदे, नितीन शिंदे, गोकूळ शेवाळे, ललित शिंदे, भाऊसाहेब आहेर, प्रवीण आहेर, सचिन रौंदळ, नीरज पगार, पवन पगार, गोपाळ शिंदे, दत्तू पगार, अशोक शिंदे, जयेश शिंदे, गौरव शिंदे, महादू आहेर, सुरेश शिंदे आदि शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 4:19 AM