चार महिन्यांपूर्वी रुग्णांअभावी कळवण उपजिल्हा रुग्णालयात रिकामे बेड आणि आता रुग्ण दाखल करायला बेड शिल्लक नसल्याचे चित्र बघून रुग्णालयातील कामाचा दर्जा सुधारल्याचे निदर्शनास आल्याने आमदार नितीन पवार यांना सुखद धक्का बसला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी कळवण उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देऊन रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्य सेवेचा आढावा घेतला तेव्हा प्रसूतीसाठी येणाऱ्या भगिनीसाठी आवश्यक त्या सेवा उपलब्ध असून केवळ बेड कमी पडत असल्याचे निदर्शनास आले. सर्पदंश, विषप्रयोग, हृदयविकार यासारख्या तात्काळ सेवा रुग्णांना देण्यासाठी लस, पुरेसा औषधसाठा उपलब्ध करा, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मृत्यूदर कसा कमी राहील, याचे नियोजन करण्याच्या सूचना पवार यांनी यावेळी दिल्या. लहान बालकांसाठी कोविड उपचारासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करून कार्यान्वित करा, ऑक्सिजन टंचाई भासणार नाही याचे नियोजन करून ७ दिवसांत ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याच्या सूचनाही वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनंत पवार यांना दिल्या.
इन्फो
ऑक्सिजन प्लांट लवकरच कार्यान्वित
रुग्णालयात कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांट कार्यन्वित होणार असल्यामुळे व रुग्णालयाची गरज लक्षात घेऊन जिल्हा नियोजनमधून जनरेटर व ६ केएल क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन टँक मंजूर केल्याचे आमदार पवार यांनी यावेळी सांगितले. यावेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नीलेश लाड, डॉ. पराग पगार, डॉ. प्रल्हाद चव्हाण, डॉ. दीपक बहिरम, डॉ. धामणे, डॉ. गोडबोले, डॉ. चौरे, कुणाल कोठावदे, योगेश भोये, संदीप सूर्यवंशी, रवींद्र शिवदे, विकास थोरात आदी उपस्थित होते.
फोटो - १९ कळवण हॉस्पिटल
कळवण उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करताना आमदार नितीन पवार. समवेत राजेंद्र भामरे, ऋषिकेश पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनंत पवार, डॉ. पराग पगार, डॉ. प्रल्हाद चव्हाण, डॉ. दीपक बहिरम, संदीप सूर्यवंशी.
190821\134319nsk_56_19082021_13.jpg
फोटो - १९ कळवण हॉस्पिटल कळवण उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करतांना आमदार नितीन पवार. समवेत राजेंद्र भामरे, ऋषिकेश पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ अनंत पवार, डॉ. पराग पगार, डॉ प्रल्हाद चव्हाण, डॉ दीपक बहिरम, संदीप सूर्यवंशी.