सिन्नर : येथील महिला मंडळ संचलित मातोश्री सगुणाबाई भिकुसा प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांच्या बुद्धीला अधिक चालना मिळावी, यासाठी नवी दिल्ली येथील अखिल भारतीय महिला परिषद व सिन्नर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्मरणशक्ती व बौद्धिक पातळी चाचणी शिबिर घेण्यात आले. महिला मंडळाच्या अध्यक्ष नलिनी क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबिरात डॉ. संगीता कर्डिले व पूनम गवारे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. शिबिरात इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती व बौद्धिक पातळीची तपासणी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांची विविध भाषिक व अंकगणितीय चाचणी घेण्यात आली. त्याद्वारे विद्यार्थ्यांची प्रगती व बौद्धिक क्षमता अभ्यासण्यात आली. यावेळी डांग सेवा मंडळाचे अध्यक्ष हेमलता बीडगर, सिन्नर महिला मंडळ उपाध्यक्ष विजया सांगळे, मुख्याध्यापक वृषाली गोसावी, सचिव रंजना क्षत्रिय, सहसचिव कीर्ती अंकार, खजिनदार वैशाली कुलकर्णी, माधुरी गुजराथी, नीलिमा लुटे आदी उपस्थित होते. शाल्मली अहेर यांनी सूत्रसंचालन केले. प्रभावती सोनवणे यांनी आभार मानले.
भिकुसा शाळेत बौद्धिक चाचणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 1:45 AM