नाशिक : नवरात्रोत्सवाच्या मध्यापर्यंत बहुतांश पक्ष, आघाडी, युती यांच्या उमेदवाऱ्या जाहीर केल्या जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचाराला फारसा कालावधी नसल्याने तसेच नवरात्रोत्सवासारखा नागरिकांच्या सहभागाचा सण आयताच हाती गवसणार असल्याने यंदाच्या निवडणुकी तील बहुतांश इच्छुकां- कडून प्रचारासाठी या सणाचा पुरेपूर वापर करून घेण्याचे नियोजन आखले आहे. अर्थात या तयारीची जिल्हा प्रशासनालादेखील जाणीव झाली असल्याने त्यांच्याकडून नवरात्रोत्सव आणि गरब्यासाठीच्या मंडपांतील उपक्रमांवरही नजर ठेवली जाणार आहे.शनिवारच्या सर्वपित्री अमावास्येनंतर नवरात्रोत्सवाला रविवारपासून प्रारंभ होत असून, चांगल्या मुहूर्तावर अर्ज भरणे त्यामुळे सोमवारपासून शक्य होणार आहे. सर्व युती आणि आघाड्यांसह अन्यराजकीय पक्षांकडून त्यांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर होण्यास रविवारी किंवा सोमवारी प्रारंभ होणार आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या मध्यापर्यंत अर्थात ३ आॅक्टोबरपर्यंत बहुतांश प्रमुख उमेदवारांनी अर्ज भरण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केलेली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यानंतर मिळणारे नवरात्रोत्सवाचे उत्तर पर्वातील चार दिवस तसेच ८ तारखेचा दसºयाचा सण हादेखील नागरिकांसमवेत जनसंपर्कासाठी मोक्याचा ठरणार आहे.त्यामुळे पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील प्रत्येक दिवस हा उमेदवारांसाठी मतदारांपर्यंत पोहोचण्याची सुवर्णसंधी ठरणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या सार्वजनिक मंडळांना वेगवेगळ्या दिवशी भेटी देणे, तेथील दांडिया-गरब्यात सहभागी होणे, तिथे येणाºया नागरिकांशी संवाद साधणे, प्रचारपत्रकांचे वाटप करीत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.दसºयाचा इच्छुकांना धसका४दसºयाच्या दिवशी सोने म्हणून आपट्याचे पान एकमेकांना देण्याची प्रथा आहे; मात्र अगदी निवडणुकीच्या तोंडावर दसरा आल्याने दसºयाच्या दिवशी उमेदवारांकडून खरेखुरे सोने लुटायला मिळणार का ? असा सवाल आतापासून समाजमाध्यमांवर फिरू लागला आहे. त्यामुळे दसºयाला मतदारांना केवळ समाज माध्यमांवरूनच शुभेच्छा देण्याचा मानसदेखील अनेक इच्छुकांकडून व्यक्त केला जात आहे.निवडणूक आयोग दक्ष४निवडणुकीसाठीचे मतदान होईपर्यंत प्रत्येक सण, सोहळ्यावर निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाची नजर राहणार आहे. या सण, समारंभांमध्ये कोणत्याही प्रकारे प्रचार, प्रसाराचा प्रयत्न झाल्यास संबंधित पक्षाच्या उमेदवाराच्या खर्चात तो समाविष्ट केला जाणार आहे.
नवरात्रोत्सव ‘कॅश’ करण्याचा इरादा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 12:38 AM