शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

घरफोड्या करणाºया आंतरराज्यीय टोळीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 1:17 AM

नाशिक : शहरात प्रवेश करणाºया वेगवेगळ्या रस्त्यांद्वारे आगमन, घरफोडीचे परफेक्ट प्लॅनिंग, अवघ्या दहा-पंधरा मिनिटांत किमती ऐवज साफ केल्यानंतर टोलनाके वाचवत विविध दिशांना फरार होण्याबरोबरच घरफोडीपूर्वी व त्यानंतर मोबाइलचा वापर न करण्याबरोबरच कोणताही इलेक्ट्रॉनिक पुरावा हाती लागणार नाही याची पुरेपूर काळजी घेणाºया दिल्लीतील सराईत व केवळ दिवसा घरफोड्या करणाºया चौघा दरोडेखोरांना ...

ठळक मुद्देशहर गुन्हे शाखेची कामगिरी ११ घरफोड्यांची उकल२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक : शहरात प्रवेश करणाºया वेगवेगळ्या रस्त्यांद्वारे आगमन, घरफोडीचे परफेक्ट प्लॅनिंग, अवघ्या दहा-पंधरा मिनिटांत किमती ऐवज साफ केल्यानंतर टोलनाके वाचवत विविध दिशांना फरार होण्याबरोबरच घरफोडीपूर्वी व त्यानंतर मोबाइलचा वापर न करण्याबरोबरच कोणताही इलेक्ट्रॉनिक पुरावा हाती लागणार नाही याची पुरेपूर काळजी घेणाºया दिल्लीतील सराईत व केवळ दिवसा घरफोड्या करणाºया चौघा दरोडेखोरांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने गुजरातमधील वडोदरा येथून अटक केली़ या टोळीने शहरातील अकरा गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्यांच्याकडून २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ़ रवीद्र सिंगल यांनी सोमवारी (दि़१२) पत्रकार परिषदेत दिली़शकील ऊर्फ मुल्ला इस्माईल कुरेशी (६२, रा़मुरादनगर, उत्तर प्रदेश), इर्शाद सिंधू कुरेशी (४६, राग़ाझियाबाद, उत्तर प्रदेश), इशरत अली इज्जत अली (२९, रा़दिल्ली़, मोहम्मद शमशाद मोहम्मद निजाम (१८, रा़ मुरादनगर, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या सराईत घरफोड्यांची नावे आहेत़ शहरात २०१७ ते १८ या कालावधीत अनेक ठिकाणी दिवसा घरफोड्या होऊनही त्यांची उकल होत नव्हती़ पोलीस आयुक्तसिंगल व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वाघ यांनी बाहेरची टोळी कार्यरत असल्याची शक्यता वर्तविली होती़ त्यानुसार आयुक्तांनी निरीक्षक वाघ व सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या अधिपत्याखाली विशेष पथकाची स्थापना केली़ सुमारे तीन महिने परिश्रम घेतल्यानंतर संशयित हे दिल्ली, गाझियाबाद, मेरठ येथील असल्याची माहिती पथकास मिळाली़दिल्लीतील ही टोळी घरफोडीसाठी महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक वाघ, सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलीस हवालदार रवींद्र बागुल, दीपक जठार, पोलीस शिपाई विशाल देवरे, विशाल काठे, स्वप्नील जुंद्रे, गणेश वडजे यांचे पथक गुजरात राज्यातील सुरत, अहमदाबाद, बडोदा येथे गेले होते़ बडोदा येथून या चौघांना अटक केल्यानंतर त्यांनी शहरातील पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत तीन, उपनगर (३), मुंबई नाका (२), गंगापूर, भद्रकाली व आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील प्रत्येकी एक अशा अकरा घरफोड्यांची कबुली दिली़ गत दीड वर्षातील सर्वोत्तम कामगिरीशहरात भरदिवसा घरफोडी करणारी बाहेरची टोळी असल्याची केवळ माहिती मिळाली होती़ त्यानुसार शहर गुन्हे शाखेने गत तीन महिने इलेक्ट्रॉनिक दस्तऐवजांचा बारकाईने अभ्यासाद्वारे अथक परिश्रम करून दिल्लीतील आंतरराज्यीय टोळीतील म्होरक्या शकिलसह त्याच्या साथीदारांना तीन अटक केली़ पाचवा संशयित फरार असून, त्याचा शोध सुरू आहे़ गत दीड वर्षांतील ही सर्वोत्तम कामगिरी असून, कोणताही पुरावा नसताना या सराईत गुन्हेगारांना अटक केली़ या तपासाबाबत गुन्हे शाखेला २५ हजार रुपयांचे रिवॉर्ड दिले जाणार आहे़- डॉ़रवींद्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त, नाशिक