नांदगाव : येथील मविप्र संस्थेच्या कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आंतरविभागीय मुलांची नेटबॉल स्पर्धेत पुणे शहर,पुणे ग्रामीण,नगर व नाशिक या चार संघात एकुण सहा सामने झाले. त्यात नाशिक विभागाने प्रथमच प्रथम क्र मांक पटकवला आहे. या सामन्यांचा निकाल पुढील प्रमाणे आहे. नाशिक विरूध्द पुणे शहर ४५-२६ , पुणे जिल्हा विरूध्द अहमदनगर ३७-२०, नाशिक विरूध्द अहमदनगर ४८-२०, पुणे जिल्हा विरूध्द पुणे शहर ३०-२८, पुणे शहर विरूद्ध अहमदनगर ३७-२०, नाशिक विरूध्द पुणे जिल्हा ३६-३२. पुणे जिल्हा संघाने द्वितीय, पुणे शहर संघाने तृतीय तर अहमदनगर संघाने चतुर्थ क्र मांक मिळवला. स्पर्धेसाठी नेटबॉलचे आंतरराष्ट्रीय पंच अश्पाक शेख, राष्ट्रीय पंच स्विप्नल कर्पे, तसेच संकेत कदम व अनिल औशिकर यांनी गुणलेखन व टाईम किपर म्हणून काम पाहीले. संयोजन शारीरीक शिक्षण संचालक प्रा.दिनेश उकिर्डे यांनी केले. प्रतिक्षा घुगे, पल्लवी जाधव,सायली कोरडे,आरती नंद, भाग्यश्री शिंदे,शुभांगी पाटील,पुनम तळेकर,पुजा तळेकर,यांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
आंतरविभागीय नेटबॉल (मुले) स्पर्धेत नाशिक विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 1:19 PM