शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

पालिकेच्या घरकुलांचा परस्पर विक्रीचा डाव

By admin | Published: September 08, 2015 11:25 PM

फसवणुकीचे प्रकरण : मनपा प्रशासनामार्फत चौकशी सुरू

नाशिक : जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुथ्थान योजनेअंतर्गत महापालिकेच्या वतीने आनंदवली परिसरात राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेतील घरकुले बोगस प्रमाणपत्रांचे वाटप करत परस्पर विक्री करण्याचा डाव उघडकीस आला असून, प्रशासनाने याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेमार्फत शहरात ठिकठिकाणी झोपडीधारकांसाठी घरकुल योजना राबविली जात आहे. काही भागात लाभार्थ्यांना घरकुलांचे वाटपही करण्यात आले आहे. आनंदवली भागातही शिवनगर परिसरात मनपामार्फत ८५ घरांची योजना राबविली जात असून, सद्यस्थितीत बांधकाम सुरू आहे. लाभार्थींना घरकुल वाटपाची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नसताना आनंदवली परिसरात घरकुल वाटपाची प्रमाणपत्रे वितरित केली जात असल्याचे अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी महापालिकेचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांना माहिती घेण्यास सांगितले. त्यानुसार बहिरम यांनी तत्काळ चौकशी सुरू केली आहे. दिल्ली येथील इंदिरा गृह प्रकल्प योजना या नावाने सदर प्रमाणपत्र वाटप केले जात असून, त्यात ‘सन २०१३-१४ मध्ये घरकुल बुकिंग करण्यात आलेल्या व्यक्तींच्या उपलब्ध माहितीनुसार प्रमाणित करण्यात येते की, अमुक व्यक्ती दारिद्र्यरेषेखालील आहे. सदर व्यक्तीचा घर क्रमांक अमुक असून, आनंदवली परिसरात सन २०१७ मध्ये घरकुल वाटप करण्यात येईल’ असा उल्लेख करण्यात आला आले. याशिवाय प्रमाणपत्रावरच घरकुलासाठी जागा खरेदी-२०१५, बांधकाम -२०१६ आणि घरकुल वाटप-२०१७ असेही स्पष्ट नमूद करण्यात आले असून, कालावधी तीन वर्षांचा म्हटले आहे. प्रमाणपत्रावर इंदिरा घरकुल योजनेचा शिक्का मारताना विभागीय अधिकारी म्हणून स्वाक्षरी करण्यात आली आहे. घरकुल योजनेच्या नावाखाली सदर प्रमाणपत्राच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने प्राप्त झालेल्या प्रमाणपत्राच्या आधारे महापालिका प्रशासनाने आता यामध्ये सहभागी असणाऱ्यांचा शोध घेत चौकशी सुरू केली आहे. सदर प्रमाणपत्र कोणाकडून वाटप केले जात आहे, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार होऊन अनेकांची फसवणूक झाली असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.जवाहरलाल नेहरु पुनरूथ्थान योजनेअंतर्गत नाशिक शहरात दुर्बल घटकातील नागरिकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)