वणी : ग्रामपालिकेकडुन अंतर्गत रस्त्यांच्या विकासकामांना गती देण्यात आली आहे. काँक्रिटीकरण पद्धतीच्या कामामुळे अनेक वर्षांची दैना हटणार आहे. सुमारे २५ हजारापुढे लोकसंख्या असलेल्या वणी शहरातील रस्त्यांची पुरती वाट लागली होती. ठिकठिकाणी खड्डेमय रस्त्यांमुळे काही भागांमधे वाहने चालविणे अवघड झाले होते. आमदार नरहरी झिरवाळ यांना याबाबत वेळोवेळी अवगत करण्यात आले. ग्रामपालीका स्तरावर निधीच्या विनीयोगासाठी सरपंच सुनिता भरसठ , उपसरपंच मनोज शर्मा , ग्रा प सदस्य विलास कड , इंदा गांगुर्डे व कायर्कारी मंडळाच्या सदस्यांनी पाठपुरावा करुन नियोजन आखल्याने अंतर्गत रस्त्यांच्या कामाला वेग आला आहे. स्वच्छ वणी सुंदर वणी ग्रामपालीकेचे धोरण असुन नागरीकांचे सहकार्य व योगदान विकासासाठी अपेक्षित असल्याची माहीती उपसरपंच मनोज शर्मा यांनी दिली. याप्रसंगी बबनराव आव्हाड, केदु पाटील , हसमुख बोथरा , रोशन समदडीया ,भरत पवार , सचिन देशमुख, राजेन्द्र कटारीया , समीर शर्मा यावेळी उपस्थित होते.