नाशिक : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्याग मंडळाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन अथवा पारंपारिक व्यावसाय चालविणाऱ्या ग्रामीण भागातील कारागिर आणि उद्योजकांच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी शासनातर्फे आंतरराष्ट्रीय वितरक नेमण्यात आले आहेत. या वितरकांच्या माध्यमातून जिल्हास्तरावरही उपवितरक अथवा प्रतिनिधींची नियुक्ती करून ग्रामीण भागातील कारागीराला त्यांच्या मालाकरीता आंतराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. निलिमा केरकट्टा दिली. महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर औचित्य साधून महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत तीन दिवशीय जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. निलिमा केरकट्टा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी ग्रामीण भागातील कारगीर आणि लघु उद्योजक यांच्या वस्तुंना बाजारपेठ मिळावी म्हणून, महाजी गांधीजींच्या विचारानुसार ग्रामीण भागातील लोक समृद्ध व्हावे हा या प्रदर्शना मागाचा हेतून असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील उद्योगांना चालना देण्यासाठी त्यांचे निर्यातक्षम उत्पादन वितरकांमार्फत थेट निर्यात केले जाणार असून उत्पादकांना ४५ दिवसांच्या आत त्यांच्या मालाची किंमत मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या उपक्रमात संबधित वितरक ग्रामीण कारागिरांच्या वस्तु उद्योजकाच्या घरी येवून त्याच्या निकषात त्या बसल्यास घेवून जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण उत्पादकांच्या वाहतूक खर्चातही बचत होणार असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामोद्योग आधिकारी सिताराम दळवी यांनी प्रास्तविक केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप उपस्थित होते.
३२ स्टॉलधारकांचा समावेश महात्मा गाधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त खादी व ग्रामोद्याग मंडळाच्या माध्यमातून आयोजित प्रदर्शनात विविध प्रकारच्या वस्तुंचे उत्पादन करणाºया ३२ स्टॉल धारकांनी सहभाग घेतला आहे. यात ग्रामीण भागातील कारागिर आणि उद्योजकांचा समावेश आहे.