नाशिक : सर्वसामान्य नागरिकांसाठी रोगापेक्षा इलाज भयंकर ठरलेल्या स्मार्ट रोडमुळे त्रास कमी होण्यापेक्षा वाढतच आहे. मंगळवारी (दि. १८) जुन्या आग्रारोडवर स्टेट बॅँकेच्या समोर दुपारी हा प्रकार घडल्यानंतर सर्व इंटरनेट आणि अन्य सर्व सेवा ठप्प झाल्या आहेत. नाशिक शहरात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून होत असलेल्या त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ करण्यासाठी पथदर्शी स्मार्ट रोड करण्यात येत आहेत. या मार्गावरील शासकीय कार्यालये, शाळा, व्यावसायिक आस्थापना तसेच बॅँका या सर्वांचे काय होईल, याचा विचार न करताच रस्त्याचे काम करण्यात येतअसून, त्यामुळे वाहतुकीचा तर बोजवारा उडाला आहेच शिवाय अन्य कामांतदेखील व्यत्यय येत आहे. मंगळवारी (दि.१८) दुपारी आदर्श शाळा ते स्टेट बॅँकेच्या दरम्यान स्मार्ट रोडचे काम करणाऱ्यांकडून बीएसएनलची फायबर आॅप्टीक तुटली त्यामुळे या भागातील इंटरनेट आणि दूरध्वनी सेवाच ठप्प झाली. स्टेट बॅँकेकडे पर्यायी व्यवस्था असल्याने काही प्रमाणात काम सुरू होते. मात्र अन्य सर्व आस्थापनांचे काम ठप्प झाले. बीएसएनएलच्या कर्मचाºयांनी सायंकाळी या ठिकाणी येऊन फायबर आॅप्टीक जोडण्याचे प्रयत्न केले, परंतु उपयोग झाला नाही. त्यातच रात्र झाल्याने आता बुधवारी (दि.१९) ते काम करणार आहेत, परंतु त्यामुळे परिसरातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.गेल्या महिन्याच्या अखेरीस अशाच प्रकारे अशोकस्तंभ येथे स्मार्ट रोडच्या कामातच अशाप्रकारे फायबर आॅप्टीक तुटल्याने अशोकस्तंभ, मेहेर, महात्मा गांधीरोड आणि वकीलवाडी परिसरातील सेवा ठप्प झाली होती. तीदेखील दुसºया दिवशी सुरू झाली होती. अशाप्रकारे अडचणी येऊ शकतील याची कोणतीही दक्षता न घेताच काम सुरू असल्याने दुसºयांदा हा प्रकार घडला असून, परिसरातील नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.स्मार्ट रोडचे काम करताना यंत्रणेने या भागातील नागरिक आणि व्यावसायिकांवर काय परिणाम होतील याची पूर्वदक्षता घेणे आवश्यक होते, परंतु असे कोणतेही नियोजन कंपनीकडे दिसत नाही. मंगळवारी दुपारी महागडी फायबर आॅप्टीक तुटल्याने समस्या निर्माण झाली आहे. लॅबचे सर्व काम ठप्प झाले आहे. - डॉ. नारायण विंचूरकर, वैद्यकीय व्यावसायिकस्मार्ट सिटीचा प्रकाश केव्हा पडणार?स्मार्ट रोडच्या अवघ्या १.१ किलोमीटर रस्त्यासाठी १७ कोटी रुपयांचा खर्च महापालिकेची स्मार्ट सिटी करीत आहे. इतकेच नव्हे तर हा खर्च आणखी वाढणार असून, त्याचे प्राकलन तयार केले जात आहे; परंतु रस्ते करताना काय काळजी घ्यावी याचे ज्ञानही अधिकाºयांना नाही. महापालिकेने पावसाळी गटार योजनेसाठी शहरभर खोदकाम केले तेव्हा अशाप्रकारच्या केबल समस्या सोडविण्यासाठी खास कंपनी नियुक्त केली होती. परंतु स्मार्ट सिटीत असे कोणतेही नियोजन नसून कंपनीच्या डोक्यात प्रकाश केव्हा पडणार, असा प्रश्न केला जात आहे.
फायबर आॅप्टीक तुटल्याने जुन्या आग्रारोडवर इंटरनेट सेवा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:54 AM