शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
2
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
3
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
4
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
5
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
6
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
7
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
8
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
9
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
10
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
12
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
13
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
14
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
15
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
16
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
17
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
18
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

‘मांजरपाडा’ला बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2020 9:15 PM

येवला : (योगेंद्र वाघ ) गेल्या तीन महिन्यांपासून देश कोरोनाशी दोन हात करतो आहे. कोरोनाविरुद्धच्या या जीवघेण्या लढाईत अर्थव्यवस्था डबघाईला आली आणि केंद्र व राज्य सरकारने अनेक कामांना ब्रेक दिला. जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी मांजरपाडा प्रकल्पालाही कोरोनाची बाधा झाली असून, प्रकल्प रखडल्याने बाळापूरपर्यंत पोहोचलेले पाणी यंदाही डोंगरगावपर्यंत पोहोचेल की नाही, याबाबत साशंकता आहे.

येवला : (योगेंद्र वाघ ) गेल्या तीन महिन्यांपासून देश कोरोनाशी दोन हात करतो आहे. कोरोनाविरुद्धच्या या जीवघेण्या लढाईत अर्थव्यवस्था डबघाईला आली आणि केंद्र व राज्य सरकारने अनेक कामांना ब्रेक दिला. जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी मांजरपाडा प्रकल्पालाही कोरोनाची बाधा झाली असून, प्रकल्प रखडल्याने बाळापूरपर्यंत पोहोचलेले पाणी यंदाही डोंगरगावपर्यंत पोहोचेल की नाही, याबाबत साशंकता आहे.सध्या दरसवाडी ते बाळापूर या ४० किमी अंतरात काम सुरू असून, पाणी पोहोचेपर्यंत अनकुटे रेल्वे क्रॉसिंगचेही काम पूर्ण होण्याबाबत अपेक्षा व्यक्त केली जात आहे. २५ जुलै २०१९ रोजी मांजरपाडा प्रकल्पाचे जलपूजन झाले. मांजरपाडा प्रकल्प काही प्रमाणात अपूर्ण असताना गुजरातमध्ये वाहून जाणारे पाणी बोगद्याद्वारे पुणेगाव धरणात आले. मांजरपाडा प्रकल्पाच्या पाण्याने अवघ्या आठ दिवसात पुणेगाव, ओझरखेड, पालखेड भरले आणि ५ आॅगस्ट २०१९ रोजी ११० क्यूसेसने पुणेगावमधून दरसवाडीत पाणी सोडले गेले. १३ आॅगस्ट २०१९ रोजी अवघ्या आठ दिवसात ५९ किमी अंतर कापत पाणी चांदवड तालुक्यातील भाटगावपर्यंत आले. भाटगावच्या नदीत पाणी टाकून दरसवाडीत जाणे प्रस्तावित असताना परसूलच्या (ता. चांदवड) स्थानिक लोकांनी पाणी भाटगाव नदीऐवजी परसूल नदीत टाकण्याचा हट्ट धरला. परिणामी, पाणी परसूलमध्ये टाकले गेले. त्यासाठी परसूलचे ३ मोठे बंधारे भरावे लागले. २८ आॅगस्ट २०१९ रोजी सकाळी पाणी दरसवाडीत पोहोचले. पुढे २२ दिवसात मांजरपाड्याच्या पाण्याने दरसवाडी धरण भरले आणि २० सप्टेंबर २०१९ रोजी दरसवाडी कालव्याचे गेट उघडून पाणी येवल्याच्या दिशेने प्रवाहितझाले.---------------------------------------दरसवाडी भरण्याची अपेक्षापुणेगाव ते दरसवाडीमधील १ ते २५ किमी कालवा रु ंदीकरण करून २२० क्यूसेस वहनक्षमतेचा करण्यात आला आहे. वणी येथील बोगद्याचे विस्तारीकरणाचे काम तांत्रिक कारणाने अपूर्ण राहिले असले तरी निश्चितच मागील वेळेपेक्षा जास्त वहनक्षमतेने पाणी प्रवाहित होणार आहे. पुणेगाव दरसवाडी १ ते ६३ किमीमधील कालवा सफाई झाली आहे. दरसवाडी धरणात ३३ टक्के जलसाठा शिल्लक असल्याने दरसवाडी भरण्यास वेळ लागणार नाही. दरसवाडी ते बाळापूर या ४० किमीमध्ये कालवा दुरु स्ती, लेव्हलची कामे करण्यासाठी शासकीय यंत्रणा झटत आहे. कोरोना संकटामुळे मांजरपाडा प्रकल्पाचे अपूर्ण काम पूर्ण होऊ शकले नाही. तरीदेखील आहे त्या पाण्यात निश्चितच पाणी डोंगरगावपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.---------------------------------------कोरोना संकट आले नसते तर मांजरपाडा प्रकल्प पूर्ण होऊन पूर्ण पाणी गोदावरी खोऱ्यात आले असते. तरीदेखील पुणेगाव-दरसवाडी कालवा रूंदीकरण आणि दुरु स्ती मार्च अगोदर पूर्ण झाली आहे. दरसवाडी ते बाळापूर या ४० किमीमध्ये काम सुरू आहे. पाणी येईपर्यंत अनकुटे रेल्वे क्र ॉसिंगचे काम पूर्ण होईल. पाणी डोंगरगावपर्यंत निश्चित पोहोचेल, अशी खात्री आहे.- मोहन शेलारआंदोलक, विखरणी

टॅग्स :Nashikनाशिक