नाशिक : ग्रामीण भागातील नागरिकांच्या दुचाकी चोरून त्यांची कमी किमतीत विक्री करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने शोध घेतला आहे़ औरंगाबाद जिल्ह्यातील या टोळीच्या दोन संशयितांनाही अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीच्या तब्बल अकरा दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहेत़ सतीश पंढरीनाथ पिंपळे (२०, रा. चंदनझिरा, जालना) आणि नितीन दत्ता कराडे (३०, रा. वाळुंज एमआयडीसी, औरंगाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे आणि अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी जिल्ह्यातील वाढत्या दुचाकी चोरीच्या पार्श्वभूमीवर चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना केल्या होत्या़ त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे व पथकाने बनावट नंबरप्लेट तयार करून कमी किमतीत दुचाकी विक्री करणाºयांवर लक्ष केंद्रित केले होते़ कळवण तालुक्यातील नांदुरीमध्ये अशा प्रकारे दुचाकींची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार शनिवारी (दि़२८) या परिसरात सापळा रचून नांदुरी गडाकडे दुचाकीवरून जाणारे संशयित पिंपळे व कराडे या दोघांना संशयितांना ताब्यात घेतले़ पोलिसांनी या दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी दोन महिन्यांपूर्वीच मोहाडी परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली़ तसेच साथीदार संतोष जाधव (रा़ जालना), वसंत चोथवे (रा़ वणीगड, ता़ कळवण) यांच्यासोबत नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर व श्रीरामपूर या परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली देत दोन लाख ९० हजार रुपये किमतीच्या चोरलेल्या ११ दुचाकीही काढून दिल्या़ पोलीस उपनिरीक्षक एम. एस. रणमाळे, रामभाऊ मुंढे, संजय पाटील, हनुमंत महाले, तूपलोंढे, जे. के. सूर्यवंशी, यांच्या पथकाने ही कारवाई केली.बनावट नंबर प्लेट तयार करून विक्रीग्रामीण भागातील दुचाकींची चोरी केल्यानंतर त्यावर बनावट नंबरप्लेट लावून तिची कमी किमतीत विक्री करण्याचे काम ही टोळी करीत होती़ त्यामुळे वाहनांची नंबर प्लेट तयार करून देणाºयांनी आरसी बुक, वाहनपरवाना व आधारकार्ड घेतल्यानंतरच नंबरप्लेट बनवून देण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक दराडे यांनी केले आहे़
दुचाकी चोरून कमी किमतीत विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 11:29 PM