लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव मध्य : शहरातील कुत्ता गोळीप्रकरणी आझादनगर पोलिसांनी आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश करीत सुरत येथील औषध विक्रेत्यासह तीन जणांना अटक केली. त्याच्याकडून एक ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे. संशयितांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.मागील सप्ताहात सोमवारी विशेष पोलीस पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांनी आपल्या विशेष पथकासह आझादनगर पोलीस ठाणे हद्दीत छापा टाकत घरझडतीत गर्भपाताच्या गोळ्यांचे ५३ बॉक्स, अलप्राझोलम गोळ्यांचे २१ बॉक्स, खोकल्याचे कोरेक्स औषधाच्या १४६ बाटल्या असा एकूण सव्वातीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करीत वसीम अब्दुल खालिक शेख यास अटक केली होती.शहरातील सराईत गुन्हेगार व युवक कुत्ता गोळी या नशेच्या आहारी जाऊन गुन्हेगारी करीत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे. पोलीस निरीक्षक दिलीपकुमारपारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप आव्हाड, कर्मचारी भावसार वभूषण मोरे यांनी वसीम शेख याची कसून चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहितीवरून गुजरात राज्यातील सुरत येथील औषधविक्रेता मेहुलकुमार रमेश भाई ठक्कर यास ताब्यात घेतले. त्याने चौकशी दरम्यान दिलेल्या माहितीनुसार संगनमताने दुप्पट भाडे आकारणी करून औषध वाहतूक करणाराट्रकमालक सय्यद आरीफ सय्यद जावीद, रा. माळधे शिवार, ट्रक चालक शेख अफजल शेख जमील, रा. नूरबाग, मालेगाव यांना ट्रकसह (क्र. एमएच ४१ जी७७७६) अटक करण्यात आली.या तिघांसह मुख्य संशयित वसीम शेख यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना २७ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. यापूर्वी वसीम शेख याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. अल्पवयातच मुले नशेच्या आहारीशहरात कुत्ता गोळी व्यसन गुन्हेगारांपर्यंतच मर्यादित न राहता याची चटक आता अल्पवयीन मुले व महिलांपर्यंत जाऊन पोहचली आहे. गोळीस सांकेतिक भाषेत बटन म्हटले जात असून त्याची पोहच करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर केला जातो. त्यामुळे अल्पवयातच मुले नशेच्या आहारी जात त्यांचे जीवन उद्ध्वस्त होत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील कुत्ता गोळी विक्रेत्यांवर कठोर कारवाई करत युवा पिढीचा व्यसनापासून वाचवावे, अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे.
मालेगावी कुत्ता गोळीप्रकरणी आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 10:59 PM
मालेगाव मध्य : शहरातील कुत्ता गोळीप्रकरणी आझादनगर पोलिसांनी आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश करीत सुरत येथील औषध विक्रेत्यासह तीन जणांना अटक केली. त्याच्याकडून एक ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे. संशयितांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
ठळक मुद्देकारवाई : सुरतच्या तिघांना पाच दिवस कोठडी