येवला : मुंबई उच्च न्यायालयात मराठा अरक्षणाविरोधातील जनहित याचिकेत येवला तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने हस्तक्षेप अर्ज दाखल करण्यात आला आहे.या हस्तक्षेप अर्जात उच्च न्यायालयाला विनंती करण्यात आली आहे की, सदरची जनहित याचिका ही मराठा आरक्षणाच्या विरोधात केली असून, त्या याचिकेत कोणत्याही प्रकारचे तथ्य नसून मराठा आरक्षण कसे योग्य आहे व ते कसे व कोणत्या पद्धतीने कायदेशीर आहे हे या अर्जात नमूद करण्यात आले आहे. जनहित याचिकेबाबत कोणताही निर्णय देण्याआधी न्यायालयाने आमची बाजू ऐकून घेऊन आम्हाला या जनहित याचिकेत सामील करून घ्यावे व या याचिकेला विरोध करण्याची संधी देण्यात यावी. सदर जनहित याचिकेची सुनावणी सोमवारी (दि १०) उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश व न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर ठेवण्यात आली आहे. येवला तालुक्यातील पांडुरंग धोंडीबा शेळके व प्रवीण अंकुश निकम या मराठा युवकांनी जनहित याचिकेत हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातून हे दोघेच आहे.
आरक्षणाविरोधातील जनहित याचिकेत हस्तक्षेप अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 12:57 AM
येवला : मुंबई उच्च न्यायालयात मराठा अरक्षणाविरोधातील जनहित याचिकेत येवला तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने हस्तक्षेप अर्ज दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देविशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातून हे दोघेच आहे.