नाशिक : त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या रिक्त झालेल्या विश्वस्तपदाच्या चार जागांसाठी आता २८ जूनपासून मुलाखती घेण्यात येणार असून, मंगळवारी या पदासाठी इच्छुक असलेल्या ११८ जणांनी नाशिक येथे धर्मादाय आयुक्त कार्यालयाला भेट दिली. दररोज दहा ते पंधरा जणांच्या मुलाखती घेऊन त्यातून विश्वस्तांची नेमणूक केली जाणार आहे.त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या विश्वस्तांची मुदत ३ जून रोजी संपुष्टात आली असून, त्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाने दि. ४ ते १३ जून या दरम्यान इच्छुकांकडून अर्ज मागविले होते, त्यात ११३ जणांनी विश्वस्तपदासाठी अर्ज सादर केले होते व या सर्वांना १८ जून रोजी सकाळी ११ वाजता मुलाखतीसाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे सर्व इच्छुकांनी १८ जून रोजी हजेरी लावली असता अचानक धर्मादाय आयुक्त कार्यालयाने मुलाखती रद्द करीत असल्याची नोटीस लावली. त्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याचे तसेच विश्वस्त नेमणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आल्याचे कारण देण्यात आले होते. त्यामुळे मुलाखतीसाठी आलेल्या इच्छुकांचा हिरमोड झाला होता. दि. २८ जूनपासून दररोज ठरलेल्या वेळेत मुलाखती घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले त्यासाठी दररोज दहाते पंधरा जणांना बोलविण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेल्यामुळे विश्वस्तपदासाठी मुलाखती होतात किंवा नाही याविषयी साशंकता व्यक्त केली जात असतानाच धर्मादाय कार्यालयाने सर्व इच्छुकांना मंगळवारी बोलविले होते. त्यानुसार सर्व जण सकाळी ११ वाजता उपस्थित झाले, परंतु त्यावेळीही त्यांना तेथे एक नोटीस लावलेली दिसली.
त्र्यंबक विश्वस्तपदासाठी उद्यापासून मुलाखती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 12:15 AM
नाशिक : त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या रिक्त झालेल्या विश्वस्तपदाच्या चार जागांसाठी आता २८ जूनपासून मुलाखती घेण्यात येणार असून, मंगळवारी या पदासाठी इच्छुक असलेल्या ११८ जणांनी नाशिक येथे धर्मादाय आयुक्त कार्यालयाला भेट दिली. दररोज दहा ते पंधरा जणांच्या मुलाखती घेऊन त्यातून विश्वस्तांची नेमणूक केली जाणार आहे.
ठळक मुद्दे२८ जूनपासून दररोज ठरलेल्या वेळेत मुलाखती घेण्यात येणार