नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या २९ जानेवारी २०१७ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील ठराव क्रमांक ६ नुसार नूतनीकरण कामातील अनियमितता व आर्थिक नुकसानीसंदर्भातील चौकशी समिती नियुक्ती करण्यात आली होती. या समितीचा अहवाल अध्यक्षांकडे प्राप्त झाला असून, या अहवालात समितीचे वास्तुविशारद अनिल चोरडिया यांनी सावानाचे माजी पदाधिकारी मिलिंद जहागिरदार, विनया केळकर, स्वानंद बेदरकर या तिघांवर त्यांनी अहवालात ठपका ठेवला आहे. लेखा परीक्षण करण्याची शिफारसही त्यांनी अहवालात केली आहे.सावानाच्या नूतनीकरण कामात अनियमिततेमुळे आर्थिक नुकसान झाल्याचा प्रकार पुढे आला होता. त्यानुसार वार्षिक सर्वसाधारणसभेत ठराव घेऊन चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने तब्बल दीड वर्षे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करत निष्कर्ष अहवालात नोंदविला आहे. या अहवालात काही शिफारशींसोबत भविष्यात असे आर्थिक गैरप्रकार टाळण्यासाठी काही सूचनादेखील केल्या आहेत.नूतनीकरण कामात झालेले आर्थिक नुकसानाला सर्वस्वी हे तिघे माजी पदाधिकारी जबाबदार असून, यांच्याव्यतिरिक्त अन्य व्यक्तींचाही यामध्ये सहभाग आहे किंवा नाही, हे पडताळून बघण्यासाठी व नुकसानभरपाईची रक्कम निश्चित करण्यासाठी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयामार्फत नूतनीकरण खर्चाची फेर लेखा तपासणी लेखा परीक्षकाच्या माध्यमातून करावी आणि लेखा परीक्षण अहवालानुसार निर्णय घ्यावा, अशी शिफारसही चोरडिया यांनी अहवालात केलीआहे.चौकशी अहवाल बेकायदेशीरजहगिरदार, बेदरकर, केळकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, सावानाच्या वतीने तथाकथित वास्तुविशारद अनिल चोरिडया यांचा अहवाल अध्यक्षांपासून माध्यमांपर्यंत पोहचला असला तरी, असा कुठलाही अहवाल आम्हाला मिळालेला नाही. मुळात अध्यक्षांनीच नेमलेल्या गोरवाडकर समितीचा अहवाल त्यांच्याच विरु द्ध असल्याने तो फेटाळून आपल्याला पाहिजे तसा अहवाल चोरिडया यांच्याकडून लिहून घेतला गेला.आम्ही त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिलेली आहेत; मात्र आमच्या कोणत्याच पत्राचा खुलासा चोरिडया यांनी केलेला नाही. संपूर्ण कार्यकारिणीने घेतलेल्या निर्णयांना आम्ही तिघेच जबाबदार आहोत असे गृहीत धरून सावानाचे पदाधिकारी जाणूनबुजून आम्हाला लक्ष्य करीत आहेत. या सर्व बनावाविरु द्ध आम्ही न्यायालयात दाद मागितली असून लवकरच सत्य समोर येईल.
‘सावाना’चा चौकशी अहवाल सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 1:37 AM
सार्वजनिक वाचनालयाच्या २९ जानेवारी २०१७ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील ठराव क्रमांक ६ नुसार नूतनीकरण कामातील अनियमितता व आर्थिक नुकसानीसंदर्भातील चौकशी समिती नियुक्ती करण्यात आली होती. या समितीचा अहवाल अध्यक्षांकडे प्राप्त झाला असून, या अहवालात समितीचे वास्तुविशारद अनिल चोरडिया यांनी सावानाचे माजी पदाधिकारी मिलिंद जहागिरदार, विनया केळकर, स्वानंद बेदरकर या तिघांवर त्यांनी अहवालात ठपका ठेवला आहे. लेखा परीक्षण करण्याची शिफारसही त्यांनी अहवालात केली आहे.
ठळक मुद्देआर्थिक नुकसान : जहागिरदार, केळकर, बेदरकर यांच्यावर ठपका