मुंजवाड : येथील संतोष प्रभाकर पगारे व प्रकाश प्रभाकर पगारे या दोन्ही बंधूंनी गरिबीतून कष्टाने वेल्डिंग व्यवसाय सुरू करून भरभराटीस आणला आहे. व्यवसायाची गाडी रु ळावर येत असतानाच या कुटुंबावर काळाने घाला घालून कुटुंबाची घडी विस्कटून टाकली. अपघातात मृत्यू झालेल्या शोभा पगारे आणि डांगसौंदाणे येथील रत्ना राजेंद्र गांगुर्डे या नणंद-भावजई होत. या अपघातात मृत झालेली उर्वशी (सिद्धी) ही चिमुरडी अतिशय बोलकी आणि हसरी होती. तिला सायकल चालवण्याचा छंद असल्याने संपूर्ण गावात तिची ओळख झाली होती. दुर्घटनेची बातमी गावात पसरताच तिच्या घराजवळ ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे . या अपघातात किकवारी, मुंजवाड , डांगसौंदाणे येथील वºहाडी आणि कळवण येथील वाहनचालकाचा समावेश असल्याने चारही गावांवर शोककळा पसरली आहे . अपघाताची वार्ता मुंजवाड येथे समजल्यानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली. मृतांवर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.अपघातात नणंद-भावजईचा मृत्यू झाल्याने मुंजवाड येथील पगारे, मोरे कुटुंब व डांगसौंदाणे येथील गांगुर्डे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुंजवाड येथील शोभा संतोष पगारे (४०), उर्वशी (सिद्धी) विनायक मोरे (१२) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर सरला प्रकाश पगारे (३५), यश प्रकाश पगारे (८) आणि मोहिनी विनायक मोरे (३२) गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर नाशिक येथे खासगी रु ग्णालयात उपचार सुरू आहेत.
सायकलच्या छंदामुळे ‘त्या’ चिमुरडीचा अख्ख्या गावात होता परिचय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:53 AM